मुंबई : राज ठाकरेंच्या (Raj Tackeray) अयोध्या दौऱ्यावरु (Ayodhya Visit) सध्या राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. कारण राज्यात भाजप नेते राज ठाकरेंच्या दौऱ्याचं आणि हिंदुत्वाच्या भूमिकेचं भाजप नेते भरभरून समर्थन करत आहेत. मात्र दुसरीकडे उत्तर प्रदेशातील एका भाजप खासदारानेच राज ठाकरेंच्या या दौऱ्याला कडाकडून विरोध केल्यामुळे या दौऱ्याचंं नेमकं काय होणार? हे चिंत्र अद्याप स्पष्ट होत नाही. उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी ज्या उत्तर भारतीयांना मुंबईतून धोपटून लावलं, त्यांची माफी मागावी आणि मगच अयोध्यात यावं, नाहीतर राज ठकारेंना अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. मनसेकडून मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र याच मुद्द्यावरून आता शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पुन्हा राज ठाकरे आणि मनसेला डिवचलं आहे.
राज ठाकरेंना अयोध्येला जायला भिती वाटत असेल तर त्यांनी आदित्य ठाकरेंना हात पकडून अयोध्येत जावं असा टोला दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. तसेच राज ठाकरे यांचे दोन तालुक्यापुरते आहेत. सेनेचा आजही दबदबा आहे. बाबरी मशीद कोणी विसरल नाही. जर राज ठाकरे तिथे गेले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आघात झाला तर तुम्ही जबाबदार घेणार आहात का? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच काही वर्षांपूर्वी तुम्ही यूपीच्या लोकांना बाहेर काढले. मात्र कांचन गिरी म्हटल्या प्रमाणे खेद व्यक्ती केली मग ते राज ठाकरे कुठे गेले आहेत? असा सवालही त्यांनी केला.
तसेच मनसे ही भाजपची सी टीम आहे, अशी टीका सुरूवातीपासून होत आहे. त्यावर दिपाल सय्यद म्हणाल्या, मनसे ही भाजपची टीम आहे. या काळात तुम्ही कुठले मुद्दे घेतात. महाविकास आघाडीचे ज्या पद्धतीने काम हे लोकांनी पाहिले. महाविकास आघाडी कुठे तरी चांगले काम करतंय म्हणून हे सर्व सुरू आहे. मी हिंदू आहे म्हणून का सांगावं लागतं. विरोधक बरळत असतात. अशी टीका त्यांनी केली तसेच मी वेगवेगळ्या नावाने कधीही निवडणूक लढली नाही. माझे आधार कार्ड देखील सय्यद आहे, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले.
केतकी चितळेवरही दिपाली सय्यद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. केतकी अशी व्यक्ती आहे की तिला काही तरी आजारपण आहे. मात्र कलाकार म्हणून तिने वक्तव्य केले तर केतकीला शिक्षा झाली हे बरोबर आहे, असे म्हणत त्यांनीही केतकीवरील कारवाईचं समर्थन केलं आहे.