दिशा सालियन प्रकरणात आरोप होताच आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया काय?; म्हणाले, मी एकच सांगेल…
दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी नवीन वळण आले आहे. तिच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांवर उच्च न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून, विधानसभेतील घटनांचाही उल्लेख केला. त्यांनी सरकारवर विधानसभेच्या कार्यपद्धतीबाबत आरोप केले आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी नवीन ट्विस्ट आला आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. सतीश सालियन यांनी कोर्टात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच दिशा सालियन प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आता याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरेंसह महाविकासआघाडीच्या नेत्यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना दिशा सालियान प्रकरणी विचारणा करण्यात आली. त्यावरही त्यांनी भाष्य केले. गेल्या पाच वर्षांपासून हे चालू आहे. पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झाला आहे. कोर्टात प्रकरण आहे, त्यामुळे कोर्टात बोलू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
आमच्या सूरात सूर मिसळून त्यांनीही हाऊस बंद पाडून घेतलं
“आज आम्ही राज्यापालांची भेट घेतली. काल वेळ मागितली होती. दोन तीन विषय त्यांच्यासमोर मांडली आहे. रिमुव्हल मोशनवरून आम्ही त्यांच्याकडे न्याय मागितला. ट्रस्ट ऑफ मोशन एका मिनिटात आणली. पॉइंट ऑफ प्रोसिजरमधून आणली. सर्व काही गडबड झाली नाही. असं हाऊस कधीच चालत नव्हतं. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचा अपमान सरकार आणि खुर्चीवर बसलेले लोक करत आहेत. खालच्या हाऊसमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. विषय मांडतो. कधी अबू आजमी असेल कधी औरंजेब असेल त्यावरून सत्ताधारीच पक्ष हाऊस बंद पाडतंय. त्यांच्याकडे अजेंडा नाहीये. आम्ही प्रश्न उत्तराचा तास असेल, लक्ष्यवेधी असेल मंत्री बसत नाही, अधिकारी असत नाही. त्यावर चर्चा झाली पाहिजे. आम्ही राज्यपालांना विनंती केली की सरकारमधील प्रतिनिधींना बोलावून घ्यावं आणि समज द्यावी. त्यांनी मुख्यमंत्र्यांना बोलवून घ्यावं. मुख्यमंत्र्यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना समज द्यावी. स्वतची स्वत उत्तरे द्यावी. अभ्यासपूर्वक द्यावी, अभ्यास करून द्यावी. आणि विधानसभा सुरू असताना मंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी हाऊसमध्ये हजर राहावं. काल नाना पटोले बोलायलं उभे राहिले. तेव्हा एकच मंत्री तिसऱ्या रांगेत होता. अदृश्य गॅलरीत सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी कोणीच नव्हतं. पीएही नव्हते. विरोधी पक्ष म्हणून नाही तर जनतेतून निवडून आलेले आमदार म्हणून आलो आहोत. काल सत्ताधारी आमदारही आमच्या सूरात सूर मिसळून त्यांनीही हाऊस बंद पाडून घेतलं. त्यांनाही चर्चा हवी आहे”, असेही आदित्य ठाकरेंनी म्हटले.
आम्ही त्यासाठी राज्यपालांकडे आलो नाही. विधानसभा अध्यक्षांकडून त्याबाबत अजून उत्तर येणं बाकी आहे. आमचा विश्वास आहे. लोकशाहीची जी प्रथा परंपरा पाळली जात आहे. ती पाळली जाईल आणि आम्हाला विरोधी पक्षनेता दिला जाईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे?
“तुम्हीपण या गोष्टीच्या साक्षी आहात. गेल्या पाच वर्षापासून बदनामीचा प्रयत्न होत आहे. कोर्टात प्रकरण आहे. कोर्टात बोलू. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, तुम्हाला वारंवार सांगितलं की, माझं ट्विट पाहिलं असेल. आम्ही या सरकारला या अधिवेशनात एक्सपोज केलं आहे. आम्हीच नाही तर संघानेही एक्सपोज केलं आहे. काल तर संघाचे लोकही म्हणाले की औरंगजेब हा विषय चुकीचा आहे. मग भाजपचे मंत्री त्यावर कारवाई करणार का. आम्ही हाच प्रश्न विचारत आहे. महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
“आज महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या होत आहे. राज्याची स्थिती बिकट होत आहे. निवडणूक जिंकले हे आयोगामुळे. वोटर फ्रॉडमुळे. त्यांनी १० मुद्द्यांपैकी एकही मुद्दा आणला नाही. एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. आज हाऊस माझ्यावरून बंद पाडत आहेत. पाडा. तुम्ही सत्ताधारी आहात. काम करायला निवडून दिलं आहे. बोला ना महाराष्ट्राबद्दल. पाच वर्ष हे चालू आहे. कोर्टात जे होईल ते होईल. मी एकच सांगेल. पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न झाला आहे. कोर्टात बोलू”, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.