दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची दिशाच बदलणार? वकिलांच्या त्या मागणीने कुणाच्या अडचणी वाढणार?
Disha Salian -Satish Salian : दिशा सालियान मृत्यू प्रकरणात गेल्या आठवड्यापासून वातावरण तापले आहे. गेल्या पाच वर्षांपासून आपल्याला नाहक या प्रकरणात ओढण्यात येत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे हे करत असतानाच या प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे.

दिशा सालियान हिचा मृत्यू 2020 मध्ये झाला. त्यानंतर तिच्या मृत्यूवरून राजकारण संपलेले नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. आता हे प्रकरण पुन्हा समोर आले आहे. याप्रकरणात दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा आरोप केला. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर त्यांनी नवीन तक्रारीसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ही तक्रारच एफआयआर असल्याचा दावा करण्यात आला. यामध्ये डिनो मोरियो, सुरज पांचाली, आदित्य ठाकरे यांच्यासह अंगरक्षक आणि इतरांना आरोपी करण्याची मागणी केली. त्यातच त्यांचे वकील निलेश ओझा यांनी आणखी एक मोठी मागणी केली आहे.
तो शव विच्छेदन अहवाल चुकीचा
दिशा सालेन पोस्ट मार्टम हा रिपोर्ट आम्हीच मीडियाकडे दिला, कारण हा पूर्णतः रिपोर्ट चुकीचा बनवण्यात आला होता, ज्याप्रकारे मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेने खोटा रिपोर्ट बनवून प्रकरण फिरवले होते, तसेच हे प्रकरण सचिन वाझेने फिरवले आहे, त्यामुळे हा पोस्टमार्टम रिपोर्ट बाजूला ठेवून इतर जे साक्षी पुरावे आमच्याकडे आहेत. त्याचा विचार करावा आणि केसची पुन्हा एकदा चौकशी करावी अशी मागणी दिशा सालीयन प्रकरणातील वकील निलेश ओझा यांनी केली आहे.




अरविंद सावंत यांनी फिर्यादी दिशाच्या वडिलांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली आहे पण आम्ही आधीपासूनच नार्को टेस्ट साठी तयार आहोत. फक्त आमच्या सोबत आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, डिनो मोरया, सचिन वाझे यांचीही नार्को टेस्ट करावी अशी आमची मागणी असल्याचे ॲड. ओझा म्हणाले.
तपास यंत्रणेवर वेळकाढूपणाचा आरोप
त्याबरोबरच आम्ही आज मागणी करतोय की एसआयटी जो वेळकाढूपणा करत आहे, त्या ऐवजी उद्याच ताबडतोब या प्रकरणाचे सिन रीक्रिएशन करावे, त्यावरून या केस मधल्या अनेक गोष्टी समोर येतील, आणि यावेळी आम्ही तर असणारच आहोत मात्र संपूर्ण मीडियाला घटनास्थळी न्याये अशी मागणी ॲड. ओझा यांनी सरकारकडे केली.
गँग रेपचे कलम लावा
8 जून 2020 रोजी दिशा सालियान हिचा मृत्यू झाला होता. 14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतो. याप्रकरणात तत्कालीन सरकारने तपास केला होता. हे प्रकरण घडल्यानंतर अडीच वर्षांनी राजकारण सुरू झाले. आदित्य ठाकरे यांच्यासह इतरांची नावे वारंवार सत्ताधारी घेऊ लागले. त्यानंतर पुन्हा आता त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे.
आता सरकारकडे आणखीन एक मागणी आहे ती म्हणजे या प्रकरणाचा तपास अपघाती मृत्यूच्या कलमाखाली न करता गँग रेपचे कलम लावून गुन्हा दाखल करून करावा, अशी मागणी वकील ओझा यांनी केली आहे.