मुंबईतील 25 वर्षीय मॉडेलवर बलात्कार, पोलिस उपनिरीक्षक दोन वर्षांनी निर्दोष

पीएसआय नवीन फोगट यांच्यावर 2018 मध्ये मुंबईतील 25 वर्षीय मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप होता.

मुंबईतील 25 वर्षीय मॉडेलवर बलात्कार, पोलिस उपनिरीक्षक दोन वर्षांनी निर्दोष
Follow us
| Updated on: Feb 28, 2020 | 12:51 PM

मुंबई : मुंबईतील 25 वर्षीय मॉडेलवर बलात्कार केल्याच्या आरोपातून पोलिस उपनिरीक्षकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आरोपी नवीन फोगट यांच्यावरील आरोप सिद्ध होऊ न शकल्यामुळे दोन वर्ष जुन्या आरोपातून त्यांची सुटका झाली. (PSI acquitted Mumbai Model Rape case)

पीएसआय नवीन फोगट यांच्यावर 2018 मध्ये मुंबईतील 25 वर्षीय मॉडेलवर बलात्कार केल्याचा आरोप होता. चंदिगढमधील औद्योगिक भागात असलेल्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर फोगाट यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 376 (बलात्कार) आणि 560 (धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

ऑक्टोबर 2018 मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) निलांबरी जगदाळे यांच्या आदेशानुसार फोगट यांना निलंबित करण्यात आलं होतं. संबंधित मॉडेलनेच दाखल केलेल्या फसवणुकीच्या तक्रारीचा तपास फोगट सायबर क्राइम युनिट अंतर्गत करत होते. त्याचवेळी तिने नवीन फोगट यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. ‘हिंदुस्थान टाईम्स’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.

नेमकं काय घडलं?

पंजाबी चित्रपटसृष्टीत संधी देण्याच्या बहाण्याने पंजाबमधील एका व्यक्तीने आपली 12 लाखांना फसवणूक केली, अशी फिर्याद देण्यासाठी तक्रारदार मॉडेल चंदिगढ शहरात आली होती.

12 जून 2018 रोजी संध्याकाळी काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तरुणी फोगटसोबत गेली होती. तेव्हा त्यांनी तक्रारदार तरुणीला हॉटेलला सोडण्याची तयारी दाखवली.

वॉशरुम वापरण्याच्या बहाण्याने फोगट यांनी आपल्या रुममध्ये प्रवेश केल्याचा दावा मॉडेलने केला होता. त्यांनी मला माझेच काही आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो दाखवले आणि सोशल मीडियावर ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप मॉडेलने केला होता. (PSI acquitted Mumbai Model Rape case)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.