दिव्यात अनधिकृत चाळींवर कारवाई, रहिवाशांचा जेसीबीवर चढून विरोध
ठाणे : दिवा परिसरात अनधिकृत बैठ्या चाळींवर जेसीबी चालवण्यात आला. यावेळी रहिवाशांनी कारवाईला कडाडून विरोध करत जेसीबीवर हल्लाबोल चढवला. त्यामुळे स्थानिकांची पोलिसांसोबत धुमश्चक्री उडाल्याचंही (Diwa Action on Illegal Chawls) पाहायला मिळालं. ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात अनधिकृत चाळींचं साम्राज्य आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आज (सोमवार) सकाळपासून तहसीलदारांनी कारवाईला सुरुवात केली. जवळपास 500 ते 600 चाळी असलेल्या या […]
ठाणे : दिवा परिसरात अनधिकृत बैठ्या चाळींवर जेसीबी चालवण्यात आला. यावेळी रहिवाशांनी कारवाईला कडाडून विरोध करत जेसीबीवर हल्लाबोल चढवला. त्यामुळे स्थानिकांची पोलिसांसोबत धुमश्चक्री उडाल्याचंही (Diwa Action on Illegal Chawls) पाहायला मिळालं.
ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात अनधिकृत चाळींचं साम्राज्य आहे. कोर्टाच्या आदेशानुसार आज (सोमवार) सकाळपासून तहसीलदारांनी कारवाईला सुरुवात केली. जवळपास 500 ते 600 चाळी असलेल्या या भागात काही चाळींवर जेसीबी फिरवण्यात आला.
कारवाईमुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी जेसीबीवर हल्लाबोल चढवला. तरुण, लहान मुलंच नाही तर महिलाही जेसीबीवर चढून विरोध करताना दिसल्या. जेसीबी अडवून नागरिकांनी कारवाईला विरोध केला. डोक्यावरील छप्पर गेल्याने नागरिकांचा संताप झाला.
घटनास्थळी जवळपास 500 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर तहसीलदारांची पूर्ण टीमही उपस्थित आहे. मात्र नागरिक जेसीबीला घेराव घालून विरोध करताना दिसत आहेत. या कारवाईवेळी एकही लोकप्रतिनिधी न दिसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
याआधीही दिव्यातील चाळींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र स्थानिकांच्या रोषामुळे ती थांबवण्यात आली होती. खारफुटी आणि अनधिकृत जमिनींवर या चाळी बांधल्याचं न्यायालयाने सांगितल्याची माहिती आहे. नागरिकांनी कमी किमतीत या ठिकाणी घरं विकत घेतली होती.
बिल्डर लॉबी-लोकप्रतिनिधींनी संगनमत केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या चाळी जवळपास 10-12 वर्ष जुन्या आहेत. त्यावेळीच का थांबवलं नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित (Diwa Action on Illegal Chawls) केला.