Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गणपती, इतर देवी-देवतांच्या फोटोंचे घिबली म्हणजे अपमान, ‘मुंबईच्या राजा’चं आवाहन

लालबागच्या गणपती उत्सव मंडळाने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या देव-देवतांच्या घिबली आर्टवर चिंता व्यक्त केली आहे. घिबली आर्टमध्ये व्यंग्यात्मक विडंबनाची शक्यता असल्याने आणि हे धार्मिक भावना दुखावू शकते म्हणून, त्यांनी गणपती आणि इतर देवतांच्या प्रतिमांचे घिबली आर्ट करू नये असे आवाहन केले आहे.

गणपती, इतर देवी-देवतांच्या फोटोंचे घिबली म्हणजे अपमान, 'मुंबईच्या राजा'चं आवाहन
Do not ghibli the image of GodImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Apr 03, 2025 | 12:19 PM

सध्या सर्वांच्या फोनमध्ये, व्हॉट्सअप स्टेटसपासून ते अगदी डिपीपर्यंत दिसतात ते घिबली आर्ट फोटो. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच घिबलीचे वेड लागले आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा किंवा या आर्टचा गैरवापर करून व्यंगात्मक विडंबन होण्याची शक्यता नाकारात येत नाही त्यामुळे गणपती व इतर देव – देवतांच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ करू नका, असं आवाहन लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने केले आहे.

घिबली आर्ट’मधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

घिबली आर्ट’मधील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. सर्वांमध्येच या आर्टबद्दल एक कुतूहल निर्माण झाले आहे. या कुतूहलापोटी अनेकजण गणपतीच्या छायाचित्रांचेही घिबली आर्टमध्ये रूपांतर करीत आहे. विविध संकल्पनांवर आधारित आकर्षक व लक्षवेधी देखावे आणि मूर्तिकारांनी कल्पकतेने घडवलेल्या भव्य गणेशमूर्ती हे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण. त्यामुळे अनेकजण मुंबईचा गणेशोत्सव ‘घिबली आर्ट’मध्ये करण्यासाठी उत्सुक असणारचं आणि फक्त गणेशोत्सवच नाही तर इतर देवी-देवतांचे सण, फोटो हे घिबली आर्टमध्ये केले जात असल्याचंही समोर आलं आहे.

गणेशमूर्तींच्या फोटोंचे ‘घिबली आर्ट’

परिणामी, कुतूहल आणि उत्सुकतेपोटी अनेकजण मुंबईच्या गणेशोत्सवातील विविध छायाचित्रे आणि विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींच्या फोटोंचे‘घिबली आर्ट’  करत आहेत, इतर देवांचेही फोटो घिबलीमध्ये करून ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत.

कोणत्याही देवी- देवतांचे घिबली आर्ट करू नये

त्यामुळे आता लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने समाजमाध्यमांवर एक निवेदन प्रसिद्ध करत आवाहन केलं आहे. त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की, ‘मुंबईच्या राजाच्या सर्व भक्तांना आदरपूर्वक आवाहन! आपणा सर्वांना ज्ञात आहे की, मुंबईचा राजा आणि इतर देवता आपल्या सर्वांच्या आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. देवतांच्या चित्रांमध्ये पवित्रता आणि पावित्र्य असते. सध्या समाजमाध्यमांवर काही लोक गणपतीच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ तयार करत आहेत, जे योग्य वाटत नाही. सर्वांना नम्र विनंती आहे की, कृपया गणपतीच्या छायाचित्रांचे ‘घिबली आर्ट’ तयार करू नये किंवा ज्यांनी तयार केले असेल, त्यांनी ते समाजमाध्यमांवरून काढून टाकावे. अशा प्रकारच्या ‘एआय’ ॲपमध्ये व्यंग्यात्मक विडंबन होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे नकळतपणे आपण आपल्याच देवाचा अपमान करतो. गणपतीच्या मूर्तीचे असे रूपांतर करणे योग्य नाही’. असं म्हणत त्यांनी देवी-देवतांच्या फोटोंची घिबली करू नये अशी विनंती केली आहे.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.