Doctor Strike | आश्वासन देऊन तोंडाला पानं पुसली, निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर

Mard Doctor Strike | 7 फेब्रुवारी रोजी वाटाघाटी अयशस्वी ठरल्या तर राज्यातील डॉक्टर संपावर जाणार होते. राज्य सरकारने यशस्वी तोडगा काढला. पण मान्य झालेल्या मागण्यांचीच अंमलबजावणी सरकार करत नसल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे. नाराजी डॉक्टरांनी आता पुन्हा संपाची हाक दिली आहे.

Doctor Strike | आश्वासन देऊन तोंडाला पानं पुसली, निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर
Doctor
Follow us
| Updated on: Feb 20, 2024 | 9:35 AM

मुंबई | 20 February 2024 : राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना (MARD) आणि राज्य सरकारमधील शीतयुद्ध काही थांबायचे नाव घेताना दिसत नाही. यापूर्वी राज्य सरकारने डॉक्टरांची यशस्वी मनधरणी केली होती. 7 फेब्रुवारी रोजी मार्डने संपाची हाक दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा झाली. यशस्वी वाटाघाटी झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच दिवशी संप मागे घेत असल्याची घोषणा केली होती. आता मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणीच केली नसल्याचा आरोप करत निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर जात आहे.

गुरुवारी संध्याकाळपासून संप

  • वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी वेळेत न केल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) गुरुवारी संध्याकाळपासून संपावर जाणार असल्याचे परिपत्रक काढून जाहीर केले आहे.
  • काही दिवसांपूर्वी मार्ड संघटनेने त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संप करण्याची घोषणा केली होती.मात्र, नियोजित संप सुरू करण्याच्या आधीच ७ फेब्रुवारी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात राज्यातील निवासी डॉक्टर संघटनेच्या (मार्ड) मागण्यांसंदर्भात बैठक झाली.विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरीव वाढ करण्याबरोबरच दर महिन्याच्या ठरावीक तारखेला नियमितपणे वेतन देण्याची ग्वाही देण्यात आली होती. तसेच वसतिगृह तातडीने दुरुस्त करणार असल्याचे डॉक्टरांना यावेळी सांगितले होते.

२५ वैद्यकीय महाविद्यालयात संपाचा परिणाम

हे सुद्धा वाचा

सरकारने बैठकीत आश्वासन दिले. पण आता सरकारने घुमजाव केल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे, त्यामुळे गुरुवारपासून निवासी डॉक्टर संध्याकाळपासून संपावर जाणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे.राज्यात सध्याच्या घडीला एकूण २५ वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या काळात तत्काळ विभागातील सर्व सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्यावर्षी घेतला होता संप मागे

मार्डने गेल्या वर्षी सुद्धा संपाची हाक दिली होती. आश्वासनानंतर 3 जानेवारीला संप मागे घेण्यात आला होता. सरकारने आश्वासनाकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा एकदा संपाची हाक देण्यात आली आहे. आश्वासन देऊन आता ३९३ दिवस उलटले, आजपर्यंत २८ पत्र पाठविण्यात आली. पण सरकारने कशाचीच दखल घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.