आफ्रिकन मुलीला 10 वर्षांनी शांत झोप, मुंबईतील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
मुंबई : मुंबईच्या मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात सोफिया नावाच्या 10 वर्षीय मुलीवर Uvulopalatoplasty करण्यात आली. सोफिया ही आफ्रिकेची आहे. सोफिया गेल्या दहा वर्षांपासून व्यवस्थित झोपू शकलेली नाही. तिचा जबड्याचा भाग आत असल्याने झोपल्यावर तिला श्वास घ्यायला त्रास होतो. आफ्रिकेत तिच्यावर अनेकदा उपचार करण्यात आले, मात्र त्याचा काहीही फायदा तिला झाला नाही. सोफिया ही मूळची आफ्रिकेची […]
मुंबई : मुंबईच्या मीरारोड येथील वोक्हार्ट रुग्णालयात सोफिया नावाच्या 10 वर्षीय मुलीवर Uvulopalatoplasty करण्यात आली. सोफिया ही आफ्रिकेची आहे. सोफिया गेल्या दहा वर्षांपासून व्यवस्थित झोपू शकलेली नाही. तिचा जबड्याचा भाग आत असल्याने झोपल्यावर तिला श्वास घ्यायला त्रास होतो. आफ्रिकेत तिच्यावर अनेकदा उपचार करण्यात आले, मात्र त्याचा काहीही फायदा तिला झाला नाही.
सोफिया ही मूळची आफ्रिकेची आहे. आफ्रिकेतील उपचारांचा तिला काहीही फायदा झाला नाही. त्यानंतर अखेर तिच्या आईने तिला भारतात आणून तिचा उपचार करण्याचा निर्णय घेतला. भारतात आल्यानंतर तिला मुंबईच्या वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल झाल्यावर तिच्या अनेक चाचण्या करण्यात आल्या. तिचा जबड्याचा भाग आत असल्याने झोपल्यावर तिला श्वास घेताना अडथळा यायचा. वोक्हार्ट रुग्णालयाच्या ईएनटी सर्जन डॉ. निपा वेलीमुट्टम यांनी Uvulopalatoplasty करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया वैज्ञकीय क्षेत्रात सर्वात कठीण शस्त्रक्रियांपैकी एक मानली जाते. तरी सर्जन डॉ. निपा वेलीमुट्टम यांनी ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
वोक्हार्ट रुग्णालयातील आधुनिक वैज्ञकीय यंत्रणेमुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता सोफिया ठीक आहे आणि तब्बल 10 वर्षांनंतर ती निवांत झोपू शकणार आहे. सोफियाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने तिची आई आनंदी आहे. आता लवकरच सोफिया तिच्या आईसोबत अफ्रिकेत परतणार.