शिवसेनाप्रमुख व्हायची लायकी आहे का?; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस यांना कायदा चांगला कळतो. हा काही टोमणा मारला नाही.
मुंबई : शिवाजी पार्कवरील ठाकरेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर तोफ डागली. उद्धव ठाकरे म्हणाले, माणसाची हाव किती असते. इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिलं. आमदार केलं. मंत्री केलं. आता मुख्यमंत्री झाला. तरी शिवसेना पक्षप्रमुख व्हायचं आहे. शिवसेनाप्रमुख स्वीकारणार त्याला तुम्ही. आहे लायकी. एक तर स्वतच्या वडिलांच्या नावाने मतं मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी औलाद. स्वतच्या वडिलांचा तरी विचार करायचा होता. काय दिवटं कारटं माझ्या पोटी जन्माला आलं. माझ्या ऐवजी दुसऱ्यांच्या वडिलांचं नाव लावतं. स्वताचे विचार नाही, असा आरोप ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, आनंद दिघे एकनिष्ठ शिवसैनिक होते. त्यांना जाऊन २० वर्षे झालीत. आज त्यांची आठवण आली. ते एकनिष्ठ होते. जाताना ते भगव्यातून गेली. ही सर्व माणसं बघितल्यावर बोलण्याची पंचाईत होते.
देवेंद्र फडणवीस यांना कायदा चांगला कळतो. हा काही टोमणा मारला नाही. सभ्यगृहस्थ आहेत. हा टोमणा नाही. तुमचं मी चांगलं बोलतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जाताना म्हणाले होते, पुन्हा येईन पुन्हा येईन. दीड दिवसासाठी आले. दीड दिवसात विसर्जन झाले. पुन्हा आले.
छातीवर दगड ठेवून उपमुख्यमंत्री झाले. मी टोमणा मारला. खरंच बोललो. कायद्याच्या चौकटीत राहून बोलायला सांगत आहेत. आम्हालाही कायदा कळतो. कायदा सर्वांनाच कळतो. आम्ही कायदा पाळायचा तुम्ही डुकरं पाळायची.
गणपतीच्या मिरवणुकीत गोळीबार करतात. हा तुमचा कायदा आहे. हाच तुमचा कायदा असेल तर आम्ही जाळून टाकतो. आम्ही तुमचा कायदा नाही मानत.
कुठल्या पद्धतीनं तुम्ही कायदा हाताळता. पोलिसांकडून धमक्या येतात. पैसे मागितले जातात. ठाण्याच्या महिला कार्यकर्त्याची दुकानं फोडतात. हा तुमचा कायदा असेल, तर आम्ही तो पाळणार नाही, असा दम ठाकरे यांनी दिला.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सांगितलं जातं केसेस काढू. आम्हाला मदत करा. हे शिवसैनिक शांत राहा म्हणून सांगतो म्हणून शांत आहेत. शिवसैनिकावर अन्याय करालं तर कायदा तुमच्या मांडीवर कुरवडत बसा. हा जिवंत मेळावा आहे.
रडगाणं तिकडं सुरू आहे. शिवसेना कशी चालवायची हे तुम्ही शिकवायची गरज नाही. आजही हिंदूच आहोत. उद्याही हिंदूचं असणार, असंही ठामपणे ठाकरे यांनी सांगितलं.