रेसिंगसाठी बाईक चोरी करणाऱ्या टोळीला डोंबिवलीत बेड्या
मुंबई : डोंबिवलीमध्ये बाईक चोरी करणाऱ्या चार तरुणांना मानपाडा पोलिसांनी तब्यात घेतले. चार पैकी तीन चोरटे हे अल्पवयीन असल्यामुळे त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ बाईक रेसिंगसाठी हे चोरटे बाईक चोरी करत होते. बाईक चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात बाईक चोरीच्या घटनांमध्ये […]
मुंबई : डोंबिवलीमध्ये बाईक चोरी करणाऱ्या चार तरुणांना मानपाडा पोलिसांनी तब्यात घेतले. चार पैकी तीन चोरटे हे अल्पवयीन असल्यामुळे त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ बाईक रेसिंगसाठी हे चोरटे बाईक चोरी करत होते. बाईक चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाल्यानंतर डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात बाईक चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली होती. त्यामुळे या बाईक चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस सोनारपाडा परिसरात रात्रीच्या वेळेस पेट्रोलिंग करत होते. रात्री दोनच्या सुमारास रस्त्याच्या एका बाजूला दोन बाईक वर चार तरुण पोलिसांना दिसले. त्यांना थांबवून पोलिसांनी त्यांची विचारपूस केली. पोलिसांना या तरुणांकडून कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पोलिसांनी या चार संशयितांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीनंतर या तरुणांनी ते बाईक चोरी करत असल्याची कबुली दिली. तसेच या चौघांनी आतापर्यंत 7 बाईक चोरी केल्या आहेत. या चार चोरट्यांपैकी तिघे हे अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्यांची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे. तर चौथा आरोपी गयसुद्दिन खान हा मानपाडा पोलिसांच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे, हे चार तरुण केवळ बाईक रेसिंगसाठी बाईकची चोरी करायचे. त्यांच्याकडून पोलिसांनी 7 बाईक जप्त केल्या आहेत.