डोंगरी इमारत दुर्घटना : कोसळलेली इमारत 100 वर्षे जुनी, पण अतिधोकादायक नव्हती : मुख्यमंत्री

कोसळलेली इमारत म्हाडाची 100 वर्ष जुनी इमारत होती. पुनर्विकासासाठी विकासक नियुक्त केला होता. म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतीत याचा समावेश नव्हता. विकासकाने काम वेळत केले की नाही याची चौकशी केली जाईल, अडकलेल्यांना बाहेर काढण्यास प्राथमिकता आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

डोंगरी इमारत दुर्घटना : कोसळलेली इमारत 100 वर्षे जुनी, पण अतिधोकादायक नव्हती : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jul 16, 2019 | 3:56 PM

मुंबई:  मुंबईच्या डोंगरी परिसरात चार मजली इमारत कोसळून भीषण दुर्घटना घडली. इमारत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली जवळपास 40 ते 50 जण अडकल्याची भीती आहे. या दुर्घटनेत दुपारी एकपर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र डॉक्टरांनी अधिकृतरित्या तिघांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. डोंगरीतील तांडेल स्ट्रीटवरील अब्दुल हमीद दर्ग्याजवळची केसरबाई ही ग्राऊंड फ्लोअर अधिक 4 मजली इमारत कोसळली. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही इमारत कोसळली.

दरम्यान, कोसळलेली इमारत म्हाडाची 100 वर्ष जुनी इमारत होती. पुनर्विकासासाठी विकासक नियुक्त केला होता. म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतीत याचा समावेश नव्हता. विकासकाने काम वेळत केले की नाही याची चौकशी केली जाईल, अडकलेल्यांना बाहेर काढण्यास प्राथमिकता आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

दुर्घटना झालेला भाग अत्यंत दाटीवाटीचा आहे. तिथे गर्दी न करता बचावकार्य चालले पाहिजे. जखमींना योग्य मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दुर्घटनाग्रस्त केसरबाई इमारतीत 15 कुटुंब राहात होते. ही कुटुंबं अडकल्याची भीती आहे. त्यातील किती जण घरी होते आणि किती बाहेर याची माहिती नाही. सध्या सर्व लक्ष मदतकार्यावर केंद्रीत केले जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची प्रतिक्रिया

कोसळलेली इमारत म्हाडाचीच होती. म्हाडाने रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डरला दिली होती. लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. जी इमारत कोसळली ती अत्यंत जुनी होती. कोसळलेली इमारत धोकादायक असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. तिच्या पुनर्विकासाचं काम विकासकाला देण्यात आलं होतं. आता नेमकं काय घडलं, दुर्घटना कशी झाली, जबाबदार कोण आहे, याची सविस्तर माहिती घेऊन मी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधेन, असं म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.

भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

डोंगरी परीसरात कोसळलेली ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती, अशी माहिती मिळाली आहे. इमारत धोकादायक नव्हती तर ती कोसळली कशी? त्याबाबत चौकशी करून अधिकृत माहिती घेतली जाईल, असं विखे पाटील म्हणाले.

संबंधित बातम्या

LIVE : डोंगरीत 4 मजली इमारत कोसळली, 12 जणांचा मृत्यू, जवळपास 50 जण अडकले

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.