मुंबईकरांनो मास्क वापरु नका; मरीन ड्राईव्हवर अनोखं आंदोलन

अखिल भारतीय स्वास्थ्य अभियानाकडून मुंबईकरांना मास्क न वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईकरांनो मास्क वापरु नका; मरीन ड्राईव्हवर अनोखं आंदोलन
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 6:20 PM

मुंबई : लोकांनी मास्क वापरू नये यासाठी अखिल भारतीय स्वास्थ्य अभियानाकडून मरीन ड्राईव्ह येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक तरुण-तरुणींनी एकत्र येत मास्क न घालताच आंदोलन केले. यावेळी त्यांनी मुंबईकरांना मास्क फ्री जगू द्या, अशी मागणी मांडली. (don’t use masks Akhil Bhartiya swasthya abhiyan Appeals to Mumbaikars)

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, कोरोना एक फार्स आहे. हे एक आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे. यामाध्यमातून लोकांची मोठी फसवणूक होत आहे. लोकांना घाबरवलं जात आहे. लोक घाबरतात आणि त्यामुळे मास्क वापरतात. परंतु सतत मास्क वापरल्याने कार्बन डायऑक्साईड हा वायू शरीरात जातो. त्यामुळे यकृत खराब होतं. कॅन्सरही होऊ शकतो. यकृत स्वस्थ ठेवण्यासाठी लोकांनी मास्क वापरणे बंद केले पाहीजे.

आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, घरगुती डाएटनेच कोरोनावर मात करता येईल. परंतु लोकांच्या मनात भीती पेरून आयटी कंपन्या आणि अमेरिकेसारखे देश स्वहित पाहत आहेत. पोस्टर्सच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की, आपल्याला पुन्हा लॉकडाऊनची गरज नाही. कोरोनावरील लस, मास्क, कॅशलेस सेवा यापैकी कशाचीही गरज नाही.

जर मास्कने कोरोनाला रोखता येतं तर मग सहा फुटांपर्यंतचं फिजिकल डिस्टन्स कशाला? फिजिकल डिस्टन्स पाळून कोरोनापासून बचाव करता येत असेल तर मास्क कशाला? मास्क आणि फिजिकल डिस्टन्स पाळून कोरोनाला रोखता येत असेल तर लॉकडाऊनची गरज काय? मास्क फिजिकल डिस्टन्स आणि लॉकडाऊन या तिन्ही गोष्टी कोरोनाला थोपवू शकतात तर मग लस कशाला हवी? असे अनेक प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले आहेत.

संबंधित बातम्या

चिंता वाढली! कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांच्या संख्येत वाढ, रोज 1100 लोकांचा मृत्यू

‘कोरोना झाल्यास ममता बॅनर्जींना मिठी मारेन’, इशारा देणारा भाजप नेता कोरोना पॉझिटिव्ह

(don’t use masks Akhil Bhartiya swasthya abhiyan Appeals to Mumbaikars)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.