Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीच्या कांचावर देवीदेवतांची नावे नको, महामंडळाने काढले पत्रक

एसटीच्या गाड्यांच्या काचांवर देवदेवतांचे पोस्टर्स, स्टीकर्स चिकटवले जात असतात, श्रद्धेपोटी असे प्रकार केले जात असले तरी अशाप्रकारच्या स्टीकर्समुळे चालकाला अडथळा येऊ शकतो, त्यामुळे असे स्टीकर्स काढावेत असे पत्रक काढले आहे.

एसटीच्या कांचावर देवीदेवतांची नावे नको, महामंडळाने काढले पत्रक
stbusImage Credit source: stbus
Follow us
| Updated on: Jan 20, 2023 | 12:15 PM

मुंबई : एसटी महामंडळाच्या बसेसच्या काचांवर देवी आणि देवतांचे फोटो किंवा स्टीकर श्रद्धेपोटी लावले जात असल्याचे उघडकीस आले आहे. हे फोटो लावण्याने ड्रायव्हरला रस्त्यावरील वाहने दिसण्यास अडथळा येऊन अपघाताला निमंत्रण मिळू शकते. त्यामुळे एसटी महामंडळाने परिपत्रक काढत अशाप्रकारे एसटीच्या कांचावर कोणत्याही प्रकारची स्टीकर चिकटवू नये असे आदेशच काढले आहेत. एसटी महामंडळाच्या  नागपूर विभागाला अशा प्रकारचे परिपत्रक लिहून एसटी काचा स्वच्छ असाव्यात असे म्हटले आहे.

एसटी महामंडळाने एसटी बस आणि एसटी स्थानक परीसर स्वच्छ मोहिम सुरू केली असून त्याच योजनेचा हा एक भाग असल्याचे म्हटले जाते. एसटीला ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हटले जात असून या सार्वजनिक परीवहन सेवेचा अपघाताचा दर इतर वाहनांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. दर एक लाख किलोमीटरला एसटी चालकाच्या अपघाताचे प्रमाण 0.17 टक्के इतके कमी आहे. समोरच्या वाहनाची चुकीचे प्रमाण 90 टक्के इतके आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास इतर खाजगी वाहनांच्या तुलनेत खूपच सुरक्षित मानला जात असतो.

एसटी महामंडळ प्रवासी तिकीटामागे एक रूपया प्रवाशांचा विमा उतरवित असते, त्यामुळे प्रवाशांचा दहा लाखाचा विमा उतरविला जात असतो. एसटीचा हा सुरक्षित प्रवास आणखीनच सुरक्षित करण्यासाठी एसटीच्या काचांवर देवी देवतांचे स्टीकर किंवा फोटो, अथवा नाव दिल्याने ड्रायव्हर समोरील दृश्यमानतेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळु शकते.

एसटीवर काळुआई, बाळूमामा, जय मल्हार, करवीर वासिनी, विठुमाऊलीचे किंवा इतर कोणतेही देवीदेवतांचे फोटो लावू नयेत ज्यामुळे चालकाची दृश्यमानता कमी होईल असे पत्र महामंडळाचे महाव्यवस्थापक ( यंत्र अभियंता ) नं.शि.कोलारकर यांनी नागपूर विभागाला लिहिले आहे. ते समाजमाध्यमावर चांगलेच व्हायरल होत आहे.

धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.