मृतदेहाशेजारी उपचार, व्हायरल व्हिडीओनंतर सायन रुग्णालयाच्या डीनची उचलबांगडी

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता (Dean) डॉ. प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली (Dr Ramesh Bharmal Sion Hospital New Dean) आहे.

मृतदेहाशेजारी उपचार, व्हायरल व्हिडीओनंतर सायन रुग्णालयाच्या डीनची उचलबांगडी
Follow us
| Updated on: May 09, 2020 | 11:53 AM

मुंबई : राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढत (Dr Ramesh Bharmal Sion Hospital New Dean)  चालली आहे. काही दिवसांपूर्वी सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. डॉ. रमेश भारमल हे सायन रुग्णालयातील नवे अधिष्ठाता असणार आहे.

नुकतंच मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह अतिरिक्त आयुक्त, मदत व पुनर्वसन सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग सचिवांचीही तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानतंर आता सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता (Dean) डॉ. प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

डॉ. रमेश भारमल नवे डीन

मुंबई महापालिका आयुक्तांनी डॉ. रमेश भारमल यांनी सायन रुग्णालयाच्या संचालक आणि अधिष्ठातापदी नेमणुकीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार डॉ. रमेश भारमल हे 24×7 सायन रुग्णालयात राहणार आहेत. डॉ. भारमल यांच्यावर कुपर रुग्णालय आणि एच. बी. टी मेडिकल कॉलेज यांच्यावर लक्ष ठेवण्याची देखील जबाबदारी असणार आहे.

तर सायन रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांना त्यांच्या जुन्या विभागात पाठवण्यात आले आहे. डॉ. भारमल यांनी यापूर्वी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून काम पाहिलं आहे.

काही दिवसांपूर्वी डॉ. रमेश भारमल यांना नायर रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदापासून मुक्त करण्यात आलं होतं. त्यांच्या जागी डॉ. मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आली (Dr Ramesh Bharmal Sion Hospital New Dean) होती.

‘या’ कारणांमुळे डॉ. प्रमोद इंगळे यांची बदली

सायन रुग्णालयात मृतदेहाशेजारीच कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यात ज्या वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याच वॉर्डमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ठेवले आहेत. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या समोर आला होता. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

तसेच या रुग्णालयातली एका वॉर्डमधून रुग्ण पळून जात असल्याचे व्हिडीओही समोर आले होते. या दोन्ही घटनेनंतर प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती.

“कोरोनाने मरणाऱ्या रुग्णांचे मृतदेह घेण्यासाठी त्यांचे नातेवाईक घाबरत होते. त्यामुळे हे मृतदेह आम्ही तिथे ठेवले होते. आता आम्ही हे मृतदेह तेथून हटवले असून या घटनेची अधिक चौकशी सुरु आहे”, असं डॉक्टर प्रमोद इंगळे यांनी सांगितले होते.

या चौकशी समितीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आली आहे. या घटनेनंतर सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता (डीन) प्रमोद इंगळे यांची उचलबांगडी करत त्याजागी डॉ. रमेश भारमल हे सायन रुग्णालयातील नवे अधिष्ठाता (Dr Ramesh Bharmal Sion Hospital New Dean) असणार आहे.

संबंधित बातम्या : 

Shocking Video : मृतदेहाशेजारी कोरोना रुग्णांवर उपचार, विरोधकांचं सरकारवर टीकास्त्र

BMC commissioner transferred | मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींना हटवलं

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.