Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीत मिठाईऐवजी नागरिकांची सुक्या मेव्याला पसंती; दहा दिवसांत 140 कोटींची उलाढाल

गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल 3700 टन सुका मेव्याची विक्री झाली असून तब्बल 2250 टन साखरेची आवक झाली आहे. | Dry Fruits sale increases in Diwali

दिवाळीत मिठाईऐवजी नागरिकांची सुक्या मेव्याला पसंती; दहा दिवसांत 140 कोटींची उलाढाल
Follow us
| Updated on: Nov 14, 2020 | 3:16 PM

नवी मुंबई: गेल्या काही वर्षांपासून आरोग्याविषयी जागरूकता वाढत आहे. तसेच कोरोनाच्या सावटाखाली यंदा दिवाळी साजरी करावी लागणार आहे. कोरोनाकाळात आशिया खंडातील मोठा बाजारपेठ मध्ये असलेल्या ड्रायफ्रूट मार्केटमध्ये काजू आणि बदाम मध्ये 50 टक्के घसरण झाल्याने यंदा दिवाळीसाठी आरोग्याची काळजी घेत मिठाईपेक्षा सुक्या मेव्याला नागरिकांकडून पसंती दिली जात आहे. (Dry Fruits cashew and almonds get cheaper)

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये तब्बल 3700 टन सुका मेव्याची विक्री झाली असून तब्बल 2250 टन साखरेची आवक झाली आहे. त्याचबरोबर खजूर व खारीकच्या विक्रीमध्येही वाढ झालेली बघायला मिळत आहे.

दिवाळी म्हटली की फराळ, आणि मिठाई आलीच परंतु यंदा दिवाळीमध्ये मिठाईऐवजी सुका मेवा, खजूर, खारीक यांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जात आहे. सध्या जगभरातून मुंबईमध्ये सुका मेवा विक्रीसाठी येत असतो. मात्र, शासनाच्या नियमांमुळे मुंबई व इतर ठिकाणी परस्पर माल जाण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजार समितीवर याचा परिणाम झाला आहे. दिवाळीनिमित्त मागील दहा दिवसांमध्ये तब्बल 3700 टन सुका मेव्याची विक्री झाली असून 1480 टन बदामची विक्री झाली आहे. तर खजूर, पिस्ता, खारीक, अक्रोड, व काजूची नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.

यंदा ड्रायफ्रुट्सचे दर घसरले असून ड्रायफ्रुट्सचा राजा मानला जाणाऱ्या काजूचे दर हे ५० टक्क्यांनी खाली घसरले आहेत. यंदा काजू ४५० प्रतिकिलो दराने विकला जात असून गेल्यावर्षी काजूची किंमत ८०० रुपये प्रतिकिलो होती. तसेच बदाम व खजुराच्या किंमतीतही ३० ते ४० टक्क्यांची घसरण झाली आहे.

गेल्या दोन महिन्यांनपासून मुंबई बाजार समितीमध्ये सुक्या मेव्याचा बाजार स्थिर असून गेल्या दहा दिवसांमध्ये सुका मेव्याच्या विक्रीतून जवळपास 140 कोटींची उलाढाल झाली आहे. एपीएमसी मार्केटबाहेरही कित्येक कोटी रुपयांची उलाढाल या व्यवसायातून झाली आहे. अनेक कंपन्यांनमध्ये व्यावसायिक, राजकीय पदाधिकारी तसेच कॉर्पोरेट कंपन्यांनी त्यांच्या येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त भेट देताना गोड मिठाईऐवजी सुका मेव्याला पसंती देत आहेत.

स्थानिक बाजारपेठांमध्ये अजूनही चिनी मालाची चलती

दिवाळीनिमित्त बाजारात आकर्षक लायटिंग्स व पणत्या आल्या आहेत. बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाशकंदील लावण्यात आले असून यंदा नागरिकांनी चायनाच्या वस्तूंवर बहिष्कार करत भारतीय बनावटीच्या गोष्टी खरेदी करण्याकडे कल दिला आहे. परंतु काही ठिकाणी चायनाच्या उर्वरित वस्तू असल्याने त्या विकण्यात येत आहेत.

बाजारात सध्या 60 टक्के चायनाच्या गोष्टी विकल्या जात असून 40 टक्के भारतीय बनावटीच्या गोष्टी विकल्या जात आहेत. एकीकडे चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकल्याचे बोलले जात असला तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर बाजारात चिनी बनावटीच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

संबंधित बातम्या:

Riteish Deshmukh | आईच्या जुन्या साडीतून मुलांसाठी नवे कुर्ते, रितेश देशमुखची खास दिवाळी

Photo : शिल्पा शेट्टीचं दिवाळी सेलिब्रेशन दणक्यात; सजावट आणि रांगोळीत रमली

(Dry Fruits cashew and almonds get cheaper)

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.