Mumbai Rains Updates | ठाण्याच्या पुढे लोकल सेवेवर परिणाम, मुंबई ते पुणे लांबपल्ल्याच्या गाड्या रद्द, पावसाने ट्रॅकवर पाणी चढले
मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे कल्याण ते कसारा लोकल वाहतूकीवर परिणाम झाला आहे. मुंबई ते पुणे लांबपल्ल्याच्या गाड्यांना रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींचा मार्ग वळविण्यात आल्या आहेत.
मुंबई | 19 जुलै 2023 : मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांना पावसाने झोडपल्याने मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. कल्याणच्या पुढे कसाराकडे जाणाऱ्या उपनगरीय लोकल सेवेला याचा फटका बसला आहे. लोकलच्या सेवेवर परिणाम झाल्याने सकाळी कामावर मुंबईत आलेल्या नोकरदार वर्गाला आता सायंकाळी घरी परताना कामावर जाताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. कल्याण स्थानकात पावसाने सिग्नल यंत्रणा बिघडल्याने कसारा दिशेने जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबई ते पुणे धावणाऱ्या लांबपल्याच्या अनेक गाड्या रद्द तर काही गाड्या अन्य मार्गाने वळविल्या आहेत.
मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने कोकण आणि आजूबाजूच्या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, कोकण, रायगड येथे पावसाने कहर केल्याने अनेक नद्यांना पुर आला आहे. कल्याण जवळ बदलापूर आणि अंबरनाथ सेक्शनमध्ये नदीला पूर आल्याने सकाळपासून लोकल सेवा बाधित झाली होती. त्यामुळे अंबरनाथ ते बदलापूर सेक्शन बंद करण्यात आला होता. त्यानंतर दुपारी 2.40 च्या सुमारास सिग्लल यंत्रेणत बिघाड झाल्याने कल्याण ते कसारा वाहतूक ठप्प झाली होती. कसाराहून कल्याणला येणारी वाहतूकही बंद झाली आहे. ताजी माहिती मिळेपर्यंत डोंबिवलीपर्यंतच लोकल सुरु आहे.
या मेल एक्सप्रेस रद्द ( 19/07/23 )
UP trains –
1)12128 Pune-CSMT Intercity exp 2)11008 Pune-CSMT Deccan exp 3)22106 Pune-CSMT Indrayani exp
DOWN trains –
1)12123 CSMT-pune exp 2)11009 CSMT-Pune Sinhagad exp
Mail express cancellations-(20/07/23 )
UP trains-
1)12124 Pune-CSMT exp 2)11010 CSMT-Pune Sinhagad exp
DOWN trains-
1)12127 CSMT-Pune Intercity exp 2)11007 CSMT-Pune Deccan exp 3)22105 CSMT-Pune Indrayani exp
Short Termination of trains- ( 19/07/23 )
UP Trains-
1)11030 Kolhapur-CSMT exp- will be short terminated at “PUNE”
DOWN Trains-
1) 11139 CSMT-GADAG Exp- will originate from “PUNE”
Mail express diversions –
UP trains-
Via karjat-panvel-diwa route-
1)22731 HYB-CSMT exp 2)22226 SUR-CSMT VB exp 3)11014 CBE-LTT exp 4)22180 MAS-LTT exp 5)12164 MAS-LTT exp 6)22160 MAS-CSMT exp
Via Daund-manmad-jalgaon-surat route- 7)22943-DD-INDB exp
Mail express diversions-
DOWN trains-
Via Diwa-panvel-karjat route-
1)22159 CSMT-MAS exp 2)22101 LTT-MDU exp 3)11019 CSMT-BBS exp 4)22732 CSMT-HYN exp 5)16588 BKN-YPR exp 6)20920 EKNR-MAS exp