आधारवाडी डम्पिंगच्या आगीवर ‘संशयाचे धूर’; आग लावली जात असल्याचा महापालिकेला संशय; पोलिसात तक्रार
कल्याणच्या आधारवाडी डम्पिगवर जाणारा ओला कचरा बंद करण्यात आला आहे, मात्र आता सुका कचरा डम्पिगवर घेऊन जाण्या येत आहे. हा सुका कचरा वर्गीकरण करण्याचे काम घेतलेल्या रेखा लाखे यांनी पालिकेची कोणतीही परवानगी न घेताच डम्पिंगवर शेड उभारण्याचे काम सुरु केले होते.
कल्याण: कल्याण आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर (Dumping ground) आग लागल्याच्या घटना घडल्या नंतर ही आग लागते की लावली जाते असा संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणी केडीएमसी प्रशासनाने (KDMC) सुडबुद्धीने आग लावली जात असल्याचा संशय व्यक्त करुन आता पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी गुलाब जगताप यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर गुलाब जगताप यांनी सांगितले आहे की, महानगरपालिकेची तक्रार योग्य आहे मात्र या प्रकरणाचा पोलिसांनी कसून तपास करावा असे सांगितले आहे.
कल्याणच्या आधारवाडी डम्पिगवर जाणारा ओला कचरा बंद करण्यात आला आहे, मात्र आता सुका कचरा डम्पिगवर घेऊन जाण्या येत आहे. हा सुका कचरा वर्गीकरण करण्याचे काम घेतलेल्या रेखा लाखे यांनी पालिकेची कोणतीही परवानगी न घेताच डम्पिंगवर शेड उभारण्याचे काम सुरु केले होते. मात्र याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाकडून या शेडवर कारवाई करत ती तोडण्यात आली.
आगीमुळे पाणी मारण्याचे काम
त्यानंतर काही दिवसात या डम्पिंगवरील कचऱ्याला मोठी आग लागली. त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका प्रशासनाची मोठी दमछाक झाली. दरम्यान आग विझवल्यानंतर पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांनी डम्पिंगवर आग लागू नये याकरिता डम्पिंगवर पाणी मारण्याचे काम राहुल मजूर कामगार सहकारी संस्था मर्यादित या संस्थेला दिले होते. या संस्थेमार्फत गुलाब जगताप पाणी मारण्याचे काम करतात.
पालिकेचे पत्र योग्य
रेखा लाखे ही गुलाब जगताप यांची बहिण असून बहिणीची डम्पिंगवरील अनधिकृत शेड तोडल्याचा राग आल्यानेच जगताप यांनी त्या आकसातूनच डम्पिंगवरील कचऱ्याला आग लावल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे याप्रकरणाची सखोल चौकशी करत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केडीएमसी उपायुक्त विजय कोकरे यांनी पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी त्यांनी गुलाब जगताप विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर याबाबत गुलाब जगताप यांनी पालिकेचे पत्र योग्य असून ही आग कोण लावतो याचा तपास पोलिसांनी करावा असे सांगत घनकचरा विभाग उपायुक्त यांनी आपली बाजू मांडली आहे.
कचऱ्याच्या आगीचा प्रश्न गंभीर
कचऱ्याच्या आगीचा प्रश्न गंभीर असल्याने त्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येऊ नये अशी मागणीही यामुळे करण्यात येत आहे. कचऱ्याला आग लागण्यासारख्या घटना वारंवार घडत असतात, त्यावर प्रशासनही फक्त कचऱ्याला आग लागल्यानंतर ती विझवण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्याबाबत कोणतीही सखोल चौकशी केली जात नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
संंबंधित बातम्या