गद्दारच! तुमच्यावरील गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसणार नाही; उद्धव ठाकरेंनी ठणकावले

पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानातील नेत्यांच्या वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी आम्हाला हिंदूत्त्व शिकवू नये

गद्दारच! तुमच्यावरील गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसणार नाही; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 8:21 PM

मुंबईः या वर्षीचा दसरा मेळावा हा ज्या प्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना वेगळा अनुभव देणार होता, त्याच प्रमाणे महाराष्ट्रासाठीही हा शिवसेनेचा दसरा मेळावा (dussehra rally) वेगळा ठरला आहे. कारण यंदा खरी शिवसेना कुणाची आणि खरा दसरा मेळावा असा सवाल उपस्थित करुन शिंदे गटानेही आपला दसरा मेळावा घेतला. त्या दसरा मेळाव्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच तुम्ही शिवसेनेत गद्दारी केली. त्यामुळे तुम्ही गद्दारच असं म्हणून शिंदे गटावर जोरदार घणाघात केला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या निमित्त बोलताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षाची परंपरा आणि दसरा मेळावे माझ्या कायम लक्षात आहे.

मात्र यावर्षीचा असा दसरा मेळावा क्वचित झाला असल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा सादत तुमच्यावरील गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसणार नाही अशी जोरदार टीकाही त्यांनी केली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील गर्दी पाहून हा अनुभव अभूतपूर्व असल्याचे सांगून मी भारावून गेलो आहे असंही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी शिवसैनिकांची आभार मानत शब्द सुचत नाही अशा शब्दात त्यांनी शिवसैनिकांचे त्यांनी आभार मानले. एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करतान त्यांनी केलेली बंडखोरी आणि मिळवलेली सत्ता ही कशी ओरबडून घेतली आहे हेही सांगितले.

त्यांनी शिवसैनिकांच्या गर्दीकडे बोट दाखवत एकनाथ शिंदे यांना जोरदार हल्ला करत म्हणाले की, हे ओरबाडून घेता येत नाही. यावेळी त्यांनी ही कोरडी गर्दी नाही, ही माझ्या जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी असल्याचेही त्यांनी सांगितले.

गद्दारी या शब्दावर जोर देत त्यांनी शिंदे गटाबरोबरच त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.

पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानातील नेत्यांच्या वाढदिवस साजरा करणाऱ्यांनी आम्हाला हिंदूत्त्व शिकवू नये असा टोलाही त्यानी लगावला.

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना गद्दारीचा मुद्दा पहिल्यांदा उपस्थित करत शिवसेनेत तुम्ही गद्दारी केली, त्यामुळे आम्ही तुम्हाला गद्दारच म्हणणारच असं म्हणत त्यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.