ईडीची मुंबईत सर्वात मोठी कारवाई, सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झवारे पुनावाला यांची मालमत्ता जप्त

ईडीने मुंबईत सर्वात मोठी कारवाई केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झवारे पुनावाला यांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. संबंधित कारवाई समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ईडीची मुंबईत सर्वात मोठी कारवाई, सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झवारे पुनावाला यांची मालमत्ता जप्त
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 9:18 PM

मुंबई : मुंबईतून खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईडीने सीरम इन्स्टिट्यूटचे संचालक झवारे पुनावाला यांना मोठा झटका दिला आहे. ईडीने झवारे पुनावाला यांच्याविरोधात कारवाई करत तब्बल 3 स्थावर मातमत्ता जप्त केल्या आहेत. झवारे पुनावाला हे सीरम इन्स्टिट्यूचे सर्वेसर्वा सायरस पुनावाला यांचे बंधू आहेत. ते कंपनीच्या डायरेक्टर टीमचे प्रमुख घटक असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे ईडीची ही कारवाई संपूर्ण पुनावाला कुटुंबाला धक्का देणारी आहे.

ईडीकडून अधिकृतपणे प्रेस रिलीज जारी करत याबाबत माहिती देण्यात आली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात झवारे पुनावाला यांचे काही व्यवहार हे संशयास्पद आढळले होते. त्यामुळे फेमा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास 40 कोटींपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

41 कोटी 64 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

ईडीकडून मुंबईतल्या वरळीतल्या सीजे हाऊस इमारतीतील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीकडून फेमा कायद्या अंतर्गत संबंधित मोठी कारवाई करण्यात आली आहे. पनामा पेपर्स प्रकरणात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. झवारे पुनावाला यांच्या 3 स्थावर मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत तब्बल 41 कोटी 64 लाख इतकी आहे.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.