अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार, ईडीची हायकोर्टात धाव, न्यायालयीन कोठडीला चॅलेंज

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायलयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. ED ने सेशन्स कोर्टाची कालच्या ऑर्डरला चॅलेंज केलं आहे.

अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार, ईडीची हायकोर्टात धाव, न्यायालयीन कोठडीला चॅलेंज
Anil Deshmukh
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 12:07 PM

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायलयीन कोठडीला ईडीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. ED ने सेशन्स कोर्टाची कालच्या ऑर्डरला चॅलेंज केलं आहे. ईडीच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या बेंच पुढे सुनावणी होणार आहे. यानिमित्तानं अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मनी लॉन्ड्रिंगप्रकणी 6 नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली होती. अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीची मुदत शनिवारी संपत असल्यानं त्यांना काल कोर्टात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख यांना ईडी कोठडी द्यावी, अशी अंमलबजावणी संचलनालयाची मागणी होती. मात्र, सत्र न्यायालयानं ईडीला धक्का देत अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. ईडीनं आता सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली असून नेमकं काय घडणार हे पाहावं लागणार आहे.

ऋषिकेश देशमुख यांना दिलासा नाही

दुसरीकडे ईडीनं अनिल देशमुख यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना गुरुवारी (5 नोव्हेंबरला) हजर होण्याचं समन्स दिलं होतं. मात्र, त्यांनी ईडीसमोर हजर होण्याऐवजी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, ऋषिकेश देशमुख यांचा अटकपर्व जामीन फेटाळण्यात आलाय.

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित एपीआय सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसंच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.

इतर बातम्या:

नवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा, समीर वानखेडेंच्या वडिलांकडून 1.25 कोटींची मागणी

मोहित कंबोज हाच आर्यन खान किडनॅपिंग प्रकरणाचा मास्टरमाइंड; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप

ED challenge session court decision of Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh fourteen days judicial custody petition file in Bombay High Court

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.