‘राजकीय हेतू पोटी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम सुरु’, अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
राजकीय हेतू पोटी मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम सध्या सुरु असल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात ईडीने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल केला आहे. त्या अनुषंगाने ईडीने आता तपास सुरु केला आहे. याबाबत मला मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळत असल्याचं देशमुख म्हणाले. मागच्या काळात CBIच्या माध्यमातून चौकशी झाली. आता ED च्या माध्यमातून होणार. राजकीय हेतू पोटी मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देण्याचं काम सध्या सुरु असल्याचा आरोप देशमुख यांनी केलाय. (Anil Deshmukh’s first reaction on enforcement directorate)
आपण गृहमंत्री असताना अन्वय नाईक प्रकरणात कारवाई केली. तसंच CBIला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्याची मुभा होती. त्यावर निर्णय घेऊन राज्यात सरकारच्या परवानगी शिवाय चौकशी करण्यास बंदी घालण्यात आली. दादरा नगर हवेलीच्या खासदार आत्महत्या प्रकरण मी विधानसभेत मांडलं. त्यामुळे केंद्र सरकार नाराज असू शकतं, म्हणून माझी चौकशी करत असावेत, असा टोला देशमुख यांनी लगावलाय.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं। pic.twitter.com/odOj1uG9AO
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) May 11, 2021
ED कडून तपास सुरु
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हाच्या अनुषंगाने ईडीने आता तपास सुरु केला आहे.
ECIR म्हणजे काय?
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) तपास सुरु करण्यापूर्वी नोंदवलेले पहिले अधिकृत दस्तऐवज म्हणजेच एन्फोर्समेंट केस इन्फर्मेशन रिपोर्ट, जो ECIR म्हणून ओळखला जातो. एखाद्या गुन्ह्यात चौकशी सुरु करण्यापूर्वी जसे पोलिस प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवतात, त्याच प्रकारे मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची माहिती मिळताच ईडी ईसीआयआर नोंदवते. त्यामुळे अनिल देशमुख यांची आता ईडीकडून चौकशी सुरु होणार आहे.
काय आहे प्रकरण?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना प्रतिमहिना 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत ही समिती चौकशी करणार आहे.
संबंधित बातम्या :
अनिल देशमुखांविरोधात गुन्हा दाखल; घर, कार्यालयासह 10 ठिकाणी सीबीआयची छापेमारी
Anil Deshmukh:आगामी काळ अनिल देशमुखांसाठी कठीण असेल; भाजप नेत्याचे सूचक वक्तव्य
Anil Deshmukh’s first reaction on enforcement directorate