सुप्रसिद्ध विकासक ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर ईडीची धाड, आर्थिक अनियमिततेच्या संशयावरुन कारवाई
शहरातील सुप्रसिद्ध विकासक ओंकार ग्रुपवर ईडीने धाड टाकली आहे. बँकांकडून घेतलेले कर्ज आणि आर्थिक अनियमिततेच्या बाबतीत ईडीने ही कारवाई केली आहे. (ED financial irregularities Omkar Group)
मुंबई : शहरातील सुप्रसिद्ध विकासक ओंकार ग्रुपच्या कार्यालयांवर ईडीने धाड टाकली आहे. बँकांकडून घेतलेले कर्ज आणि आर्थिक अनियमिततेच्या संशयावरुन ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने आपल्या कारवाईत आतापर्यंत सायन येथील ओंकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट तसेच नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग येथील ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर धाड टाकली आहे. (ED has taken action in respect of financial irregularities and loans taken from banks by Omkar Group)
मागील काही दिवसांपासून ईडीने अनेक नेते, विकासकांच्या घरावार, कार्यालयावर धाडसत्र सुरु केले आहे. धाडीच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार तसेच इतर अनियमितता यांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील बांधकाम क्षेत्रीतील सुप्रसिद्ध कंपनी ओंकार ग्रुपच्या कार्यालयावर ईडीने धाड टाकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओंकार ग्रुपने काही बँकेकडून कर्ज घेतलेल आहे. या कर्जामध्ये तसेच अन्य काही व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे ईडीने या ग्रुपच्या विविध ठिकाणांवरील कार्यालयांवर छापा टाकला आहे. ईडीने आतापर्यंत सायन येथील ओंकार बिल्डर कार्यालय, प्रभादेवी येथील ब्यूमोंटे अपार्टमेंट, नेपियन्सी रोडवरील आशियाना बिल्डिंग या जागेवर धाड टाकली आहे.
काही दिवसांपूर्वी ईडीने जेपी ईन्फ्रास्ट्रक्चरच्या कार्यालयावरुद्धा कारवाई केली होती. मिळालेल्या माहितीनुसार जेपी ईन्फ्रास्ट्रक्टर या बांधकाम क्षेत्रातील कंपनीत उत्तर प्रदेशमधील एका बड्या नेत्याने पैसे गुंतवलेले आहेत. ईडीबरोबरच या कंपनीवर आयकर विभागानेसुद्धा कारवाई केली होती. याच प्रकरणात आता ओंकार बिल्डरवर ईडी मार्फत कारवाई सुरु आहे.
हितेंद्र ठाकूर यांच्या मोहुण्याला ईडीकडून अटक
पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या कुटुंबीयांच्या विवा ग्रुपवर धाडी टाकल्यानंतर ईडीने ठाकूर यांचा पुतण्या मेहूल ठाकूरला 23 जानेवारीला अटक केलं. सोबत मदन गोपाल चतुर्वेदी यांनाही अटक केलं होतं. मेहूल ठाकूर यांना अटक केल्याने वसई-विरारमध्ये एकच खळबळ उडाली होती.
“कल भी वो हारे थे आज भी वो हारेंगे, कल भी हम जिते थे आज भी हम जितेंगे”, अजित नवलेंचा राजभवनावर जाणाच्या निर्धारhttps://t.co/PorUBBGu1C#farmlaws | #farmerprotest| #farmerprotestinmumbai| #mumbai | @DrAjitNawale1 | @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 25, 2021
संबंधित बातम्या :
ED नोटीसनंतर वर्षा राऊतांकडून 55 लाख परत, आता पुन्हा ईडी नोटीस पाठवण्याच्या तयारीत
आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पुतण्याला ईडीकडून अटक; पीएमसी घोटाळा भोवणार?
भाई ठाकूर यांच्या विवा ग्रुपवर ईडीचं धाडसत्र, 5 ठिकाणी धाडी
(ED has taken action in respect of financial irregularities and loans taken from banks by Omkar Group)