ईडी कोव्हिड घोटाळा खणून काढणार?, मुंबई महापालिकेच्या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर सकाळीच छापेमारी

सुजीत पाटकर, सुरज चव्हाण आणि संजीव जयस्वाल यांच्या घरासह 16 ठिकाणी काल ईडीने छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर आज दोन महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे.

ईडी कोव्हिड घोटाळा खणून काढणार?, मुंबई महापालिकेच्या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर सकाळीच छापेमारी
bmc officersImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2023 | 8:03 AM

मुंबई : मुंबईतील कोव्हिड घोटाळ्याप्रकरणी काल ईडीने 16 ठिकाणी छापेमारी केली. त्यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह ठाकरे गटाशी संबंधितांचा समावेश होता. ईडीच्या छापेमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे. ईडीने सुरू केलेल्या घोटाळ्याच्या चौकशीमुळे ठाकरे गट चांगलाच अडचणीत आलेला आहे. कालच्या छापेमारीनंतर ईडीची कारवाई थांबल्याचं वाटत असतानाच ईडीने आज सकाळीच मुंबई महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरी छापेमारी केली आहे. हे दोन्ही अधिकारी अत्यंत महत्त्वाचे असून त्यांचा थेट कोव्हिडच्या टेंडर प्रक्रियेशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीने केलेल्या या छापेमारीनंतर एकच खळबळ उडाली आहे.

काल ईडीने पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी छापेमारी केली होती. त्यानंतर खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या घरी छापेमारी करण्यात आली होती. ही छापेमारी सुरू असतानाच आदित्य ठाकरे यांचे खास सहकारी सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानीही ईडीने छापे मारल्याची बातमी आली. ईडीने या कोव्हिड घोटाळ्या प्रकरणी मुंबई, पुण्यातील एकूण 16 ठिकाणी छापेमारी केली.

हे सुद्धा वाचा

साडे सोळा तास छापेमारी

ईडीने सुरज चव्हाण यांच्या घरी सकाळी 9 वाजता छापेमारी केली होती. सकाळी 9 वाजल्यापासून रात्री दीड वाजेपर्यंत ईडीचे धाडसत्र सुरू होतं. साडे सोळा तास ईडीने ही छापेमारी केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ईडीने यावेळी सुरज चव्हाण यांची कसून चौकशी केल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, या छापेमारीत ईडीच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे सापडली की नाही याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, या छापेमारीवर ठाकरे गटाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळी सकाळीच धाड

ईडीने आज सकाळी पालिकेचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या निवासस्थानी धाड मारली आहे. दोघांच्याही घरात कसून चौकशी केली जात आहे. प्रत्येक कागदपत्रांची छाननी केली जात आहे. दोन्ही अधिकाऱ्यांची विचारपूस केली जात आहे. तसेच या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही बाहेर जाऊ दिलं जात नाही. तसेच कुणालाही आत सोडलं जात नाहीये. हे दोन्ही अधिकारी या घोटाळ्यातील महत्त्वाचे असल्याचं सांगितलं जात आहे.

अजून अधिकारी रडारवर

सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीला बेकायदेशीर कंत्राट देण्यात आलं होतं. टेंडर प्रक्रियेत पालिकेतील अधिकाऱ्याचा सहभाग होता का? याचा तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच या अधिकाऱ्यांकडून या घोटाळ्याशी संबंधित आणखी माहिती घेण्याचाही ईडीकडून प्रयत्न सुरू आहे. मुंबई महापालिकेतील अजून काही अधिकारी ईडीच्या रडारवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.