EXCLUSIVE | संजय राऊत 100 दिवस जेलमध्ये राहिलेल्या प्रकरणात ईडीची सर्वात मोठी कारवाई

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अटक करण्यात आलेल्या गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ईडीने या प्रकरणी आज मोठी कारवाई केली आहे.

EXCLUSIVE | संजय राऊत 100 दिवस जेलमध्ये राहिलेल्या प्रकरणात ईडीची सर्वात मोठी कारवाई
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 6:57 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) काही दिवसांपूर्वी प्रचंड मोठी खळबळ उडालेली. विशेष म्हणजे संबंधित घटना ही सत्तांतरानंतर घडलेली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) हातमिळवणी करुन नव्याने सरकार स्थापन केलेलं. या घडामोडींनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडी (ED) चौकशीला सामोरं जावं लागलेलं. तसेच त्यांना ईडीकडून अटक देखील करण्यात आलेली. विशेष म्हणजे या प्रकरणी त्यांना तब्बल तीन महिने जेलमध्ये राहावं लागलेलं. राऊत यांना जवळपास तीन महिने जामीन मिळाला नव्हतं. अखेर 103 दिवसांनी राऊतांना जामीन मिळालेला. त्यानंतर राऊतांची जामीनावर सुटका झालेली. याच प्रकरणी आता ईडीने मोठी कारवाई केली आहे.

संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा (Goregaon Patra Chawl Scam) प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी अटक करण्यात आलेली. याच प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. ईडीने गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीने आज आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांची तब्बल 31 कोटी 50 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांची गोव्यात असणारी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरण नेमकं काय?

गोरेगावातील पत्राचाळीत म्हाडाचा भूखंड आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलेलं. पण त्यांनी संबंधित जागेचा काही भाग हा खासगी विकासकांना विकल्याचा आरोप ईडीचा आहे. नियमानुसार, गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी 672 फ्लॅट तिथे राहणाऱ्या भाडेकरुंना, तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते.

या दरम्यान प्रवीण राऊत यांनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. त्यानंतर 2011, 2012, 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी विकासकांना हस्तांतरित करण्यात आले, असा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने प्रवीण राऊत यांना अटक केलेली. त्यानंतर प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आलेली. या प्रकरणी पुढे ईडीने पुढे संजय राऊत यांच्यावर आरोप केलेला. त्यानंतर राऊतांना अटकही करण्याच आलेली. याप्रकरणी ईडीकडून अजूनही कारवाई सुरु आहे.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.