ईडीचं मुंबई महापालिकेला पत्र, मोठ्या कारवाईचे संकेत? काय होणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष

ईडीकडून मुंबईत कसून तपास सुरु आहे. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून धडाकेबाज कारवाई सुरु आहे. या प्रकरणी आगामी काळात काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे ईडीने आता मुंबई महापालिकेला पत्र पाठवलं आहे.

ईडीचं मुंबई महापालिकेला पत्र, मोठ्या कारवाईचे संकेत? काय होणार? याकडे महाराष्ट्राचं लक्ष
bmc covid scamImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 8:59 PM

मुंबई : मुंबईतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईडीने मुंबई महापालिकेला पत्र पाठवलं आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हे पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात कोरोना काळातील खर्चांचे संपूर्ण तपशील मुंबई महापालिकेकडून मागवण्यात आलं आहे. कारण सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षाकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कोरोना काळात कोविड सेंटर बनवण्यात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलाय. मृतकांच्या पिशव्यांपासून अनेक वस्तूंच्या खरेदी किंमती जास्त दाखवण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. भाजपने याप्रकरणी अनेक आरोप केलाय. याच आरोपांप्रकरणी ईडीकडून आता तपास सुरु आहे.

ईडीकडून मुंबई महापालिकेला पत्र पाठवण्यात आलं आहे. कोरोना काळातील सर्व खर्चाचे तपशील ईडीने मागवले आहेत. लाईफलाईन कंपनीशी संबंधित गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणात चौकशीसाठी ही कागदपत्रे मागवण्यात आले आहेत. सध्याचे प्रशासक आणि पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हे पत्र पाठवण्यात आले आहे.

अधिकारी चौकशीच्या ससेमिऱ्यात

कोरोना काळातील कथित टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणामुळे मुंबई महापालिकेचे तत्कालीन आणि सध्याचे अधिकारी देखील चौकशीच्या फेऱ्यात आहेत. मुंबई महापालिकेने एकूण किती खर्च केला, किती टेंडर काढली आणि कुठल्या कंत्राटदारांना ती देण्यात आली होती या सगळ्यांची माहिती ईडीकडून मुंबई महापालिकेकडे मागवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबई महापालिकेचे सध्याचे प्रशासक म्हणजेच आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना याबाबतचं पत्र पाठवण्यात आलं आहे. ही सगळी माहिती कागदपत्रांच्या तपशिलासह मागवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात आण

ईडीच्या अनेक ठिकाणी धाडी

कोरोना काळातील कथित कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून तपास सुरु आहे. ईडी या प्रकरणी चांगलीच अॅक्शन मोडमध्ये आहे. ईडीने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. ईडीने याआधी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना समन्स बजावत चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने काही दिवसांपूर्वी एकाच दिवशी अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. यामध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी देखील धाड टाकली होती.

ईडीने सूरज चव्हाण यांच्या घरी तब्बल 17 तास झाडाझडती घेतली होती. त्यानंतर सूरज चव्हाण यांची ईडी कार्यालयात बोलावून चौकशी झाली. तसेच ईडीने खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्याशी संबंधित ठिकाणी देखील टाकली होती.

ईडीने मुंबई महालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजय जयस्वाल यांच्या घरी देखील धाड टाकली होती. या धाडीत ईडीला कोट्यवधींच्या मालमत्तेची कागदपत्रे मिळाली होती. याशिवाय बरंच काही मिळालं होतं. संबंधित माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे ईडीकडून अजूनही तपास सुरुच आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमकं कुणाला अटक होतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.