सर्वात मोठी बातमी, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीचे समन्स

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरातून एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना ईडीचे समन्स आल्याची माहिती समोर आलीय.

सर्वात मोठी बातमी, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीचे समन्स
मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 9:34 PM

कृष्णा सोनारवाडकर, Tv9 मराठी, मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या तक्रारीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांची मालकी असलेल्या कंपनीच्या विरोधात आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Station) गुन्हा दाखल झाल्याची बातमी ताजी असताना एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना ईडीचे समन्स(ED Summons) आल्याची माहिती समोर आलीय. ईडीने चहल यांना येत्या सोमवारी 16 जानेवारीला चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे चहल यांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोविड टेंडर घोटाळ्याप्रकरणी ईडीने हे समन्स पाठवले आहे. सोमवारी कागदपत्रांसह सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी या, असा आदेश ईडीने चहल यांना समन्सच्या माध्यमातून दिलाय.

ईडीच्या या समन्समुळे राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं प्रकरण काय?

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून कोरोना काळात मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या वेगवगेळ्या कामांच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

किरीट सोमय्या यांनी गेल्यावर्षी आझाद मैदानात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांचंदेखील नाव होतं.

संबंधित प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. त्यानंतर आता याच प्रकरणाचा समांतर तपास आता ईडीकडूनही केला जातोय. त्यामुळे या प्रकरणी आता पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची देखील चौकशी ईडीकडून केली जाणार आहे.

किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया

ईडीने इक्बाल सिंह चहल यांना समन्स बजावल्यानंतर किरीट सोमय्या यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “इक्बाल सिंह चहल गेल्या 140 दिवसांपासून संजय राऊत यांच्या पार्टनरला का वाचवत आहेत? हेच समजत नाहीय”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

“संजय राऊत आणि त्यांचे पार्टनर सुजीत पाटकरव यांनी खुल्लम खुल्ला 100 कोटींचा घोटाळा केला. त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांना वाचवण्याचं काम इक्बाल सिंह चहल करत आहेत”, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

“इक्बाल सिंह चहल यांनी गेले 140 दिवस तपास यंत्रणांना कागदपत्रे दिले नाहीत. पण हे कागदपत्रे द्यावे लागणार असा आग्रह होता. मी आज मुंबई पोलीस जॉईट कमिश्नरांशी चर्चा केली. याप्रकरणी कारवाई केली जाईलच” , अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.