पालकांना फी भरण्याची सक्ती, मुंबईतील शाळेला शिक्षण विभागाचा दणका
फी वसुलीसाठी विद्यार्थी आणि पालकांना नोटीस पाठवणाऱ्या जोगेश्वरीच्या आर.एन. शेट विद्यामंदीर शाळेला शिक्षण विभागाने दणका दिला (Education Department action on Jogeshwari School) आहे.
मुंबई : फी वसुलीसाठी विद्यार्थी आणि पालकांना नोटीस पाठवणाऱ्या जोगेश्वरीच्या आर.एन. शेट विद्यामंदीर शाळेला शिक्षण विभागाने दणका दिला (Education Department action on Jogeshwari School) आहे. फी भरण्यासाठी पालकांना जबरदस्ती करण्यात येत असल्याने शिक्षण विभागाने शाळेला नोटीस पाठवली आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शाळांना आदेश दिले होते की, पालकांककडून जबरदस्ती फी वसुली करु नये आणि फी वाढही करु (Education Department action on Jogeshwari School) नये.
ज्या सुविधा शाळा देत नाही त्या संदर्भातील शुल्क वजा करून शुल्क आकारण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यासोबत शुल्क भरणीसाठी पालकांना टप्या टप्य्याने शुल्क भरण्याची सवलत द्यावी असेही आदेश देण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षात कोणतीही शुल्क वाढ करण्यात येऊ नये. 8 मे 2020 रोजी शालेय शिक्षण विभाने परिपत्रक काढून संस्था आणि शाळांना लॉकडाऊन कालावधीत शाळेची फी भरण्यासाठी कोणत्याही प्रकारे दबाव आणू नये याबाबत आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही जोगेश्वरीची आर.एन. शेट विद्यामंदीर पालकांना फी भरण्यासाठी जबरदस्ती करत होती.
‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकांवर फीवाढीचा बोजा पडू नये, यासाठी ठाकरे सरकारने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. या आदेशानुसार महाराष्ट्रात यंदा इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अभ्यासक्रमाची फीवाढ शिक्षण संस्थांना करता येणार नाही. असे असतानाही काही शाळा पालकांवर फी भरण्यासाठी दबाव टाकत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मात्र शिक्षण संस्थांनी चालू (2019-20) किंवा आगामी (2020-21) शैक्षणिक वर्षाची शिल्लक किंवा देय वसूल करण्याची सक्ती करु नये. लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर फी जमा करावी अशा सूचनाही दिल्या आहेत.
संबंधित बातम्या :
नागपुरातील शाळांकडून पालकांना फी भरण्यास; पुस्तक खरेदीसाठी सक्ती, पालकांकडून आंदोलनाचा इशारा
राज्यातील शाळांची फी वाढ थांबवा, आशिष शेलारांचं शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र