Raju Shrivastava: कॉमेडी कशी असते हे आम्ही राजू श्रीवास्तवकडून शिकलो- एहसान कुरेशी
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधनावर एहसान कुरेशी यांनी दुःख व्यक्त केले आहे. कॉमेडी कशी असते हे आम्ही राजू राजू श्रीवास्तव यांच्याकडून शिकलो असेही ते म्हणाले.
गोविंद ठाकुर. मुंबई, कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shriwastava) हे ‘लाफ्टर चॅलेंज शो’च्या माध्यमातून सर्वाधिक लोकप्रिय झाले. या शोमध्ये त्यांचे सहकलाकार एहसान कुरेशी (Ehsan Quraishi) यांनी राजू यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. एहसान कुरेशी म्हणाले की, राजू श्रीवास्तव यांच्या जाण्याने फक्त बॉलीवूडच नाही तर संपूर्ण देशाला दुःख झालेले आहे. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या करियरच्या सुरवातीला अनेक लहान कामं केले. अथक परिश्रमानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली, असे कुरेशी म्हणाले.
छोट्या कलाकारांना करायचे मदत
राजू श्रीवास्तव यांनी नेहमीच छोट्या कलाकारांना मदत केली आहे, कॉमेडी कशी होते हे आम्ही राजू श्रीवास्तव यांच्याकडून शिकलो आहोत असेही एहसान कुरेशी म्हणाले.
राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये वर्कआऊट करताना हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर लगेचच त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या 42 दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू होते. या दरम्यान ते उपचाराला प्रतिसाद देत असल्याचे देखील समोर आले होते मात्र काही दिवसांनी त्यांची प्रकृती परत खालावली. एहसान कुरेशी यांनी राजू श्रीवास्तव यांची भेट घेतली होती. तसेच ते त्यांच्या कुटुंबियांच्या देखील संपर्कात होते, मात्र आज सकाळी त्याच्या निधनाची बातमी कळल्यावर एहसान यांना धक्का बसला.