भोसरी भूखंड प्रकरणी खडसेंची ईडी चौकशी, तारीख आणि वेळ ठरली
त्यानंतर आता खडसे उद्या चौकशीसाठी हजर राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Eknath Khadse ED inquiry at Friday)
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांची उद्या (15 जानेवारी) ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशी केली जाणार आहे. भोसरी भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र त्यानंतर खडसेंना कोरोनाची लागण झाल्याने ते क्वारंटाईन झाले होते. यानंतर खडसेंनी ईडीकडून काही दिवसांचा अवधी मागितला होता. त्यानंतर आता खडसे उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत. (Eknath Khadse ED inquiry at Friday)
एकनाथ खडसे गेल्या 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर होणार होते. जळगावात असताना खडसेंना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली. लक्षणे जाणवताच त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. मुंबईतल्या निवासस्थानी 28 डिसेंबर आणि 29 डिसेंबर खडसेंनी आराम केला. मात्र कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली होती. या चाचणीदरम्यान त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर खडसेंनी ईडीकडे चौकशीला हजर राहण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी मागितला होता.
खडसेंनी ईडीकडे मागितलेला हा कालावधी संपला आहे. त्यानंतर उद्या एकनाथ खडसेंना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता खडसे ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया
दरम्यान यापूर्वी अनेकदा माझी चौकशी केली आहे. त्यावेळी मी हजर राहिलो आहे. त्यांनी माझ्याकडे जे कागदपत्रं मागितले, ते मी दिले आहेत. याही वेळेस ईडी जे काही कागदपत्रं मागतील त्यांनी मी सहकार्य करेन,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली होती.
“माझ्या बायकोने भोसरी या ठिकाणी एक भूखंड खरेदी केला आहे. त्याबाबत ही नोटीस दिली आहे. त्या यापूर्वी चार वेळा चौकशी झाली आहे. ही पाचव्यांदा चौकशी होत आहे. हा व्यवहार रेडी रेकनरच्या दरानुसार पाच कोटींचा आहे. ती चौकशी करण्याचा ईडीला अधिकार आहे. त्यामुळे ईडीला सहकार्य करु. मी जास्त काही बोलणार नाही. जे काही आहे ते नंतर बोलेन,” असेही एकनाथ खडसे म्हणाले होते. (Eknath Khadse ED inquiry at Friday)
येत्या 30 डिसेंबरला मला हजर रहायला सांगितल आहे. मला तसा समन्स आला आहे. मी त्यानुसार उपस्थित राहणार आहे, असेही खडसेंनी सांगितलं होतं.
ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असे खडसे यांनी म्हटले होते. (Eknath Khadse ED inquiry at Friday)
रेणू शर्मांचं आणखी एक वादग्रस्त प्रकरण, आधी एअरवेज अधिकाऱ्यासोबतही लगट, नंतर पोलीस तक्रारhttps://t.co/sVh15kHlIg#RenuSharma #HoneyTrap
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 14, 2021
संबंधित बातम्या :
भोसरी भूखंड प्रकरणात नोटीस, 30 डिसेंबरला ईडी कार्यालयात हजर राहणार, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया