Eknath Shinde: शिवसेनेला हादरा देणारे बंडखोर आमदार एकाच फोटोत, एकनाथ शिंदेंसह 34 आमदारांचा समावेश; बच्चू कडूंचीही बंडाळी!

एकनाथ शिंदे यांनी काल बंडखोरी केल्यानंतर काही काही वेळ गेल्यानंतर सूरतमधील एका हॉटेलमध्ये असल्याचे जाहीर होताच महाविकास आघाडीसह राजकारणात खळबळ उडाली. त्यानंतर आज पुन्हा एकदा मध्यरात्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले 35 आमदारांचा फोटो व्हायरल होताच शिंदे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

Eknath Shinde: शिवसेनेला हादरा देणारे बंडखोर आमदार एकाच फोटोत, एकनाथ शिंदेंसह 34 आमदारांचा समावेश; बच्चू कडूंचीही बंडाळी!
एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच्या 35 बंडखोर आमदारांचा पहिला फोटो व्हायरल
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 1:52 AM

मुंबईः शिवसेनेच मंत्री आणि गटनेते असलेल्या एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनीच बंडखोरी केल्यामुळे राज्यातील राजकारणासह देशातील राजकारणातही चर्चेला उधाण आले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेच्या 33 आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे 2 आमदार (Prahar Sanghtna 2 MLA) असल्यामुळे आता 35 आमदार आपल्यासोबत असल्याचे सांगत एकनाथ शिंदे यांनी 35 बंडखोर आमदारांसोबतचा फोटो जाहीर (35 MLA Photo viral ) केला आहे. त्यामुळे आता राजकारणात आणखी एक खळबळ उडाली आहे. कारण या फोटोमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले बच्चू कडू यांच्यासह राजकुमार पटेल यांचाही त्यामध्ये फोटो असल्याने बच्चू कडूंचाही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा असल्याचेच स्पष्ट झाले आहे.

एकनाथ शिंदेंसोबत 35 आमदार

एकनाथ शिंदे यांनी काल बंडखोरी केल्यानंतर काही काही वेळ गेल्यानंतर सूरतमधील एका हॉटेलमध्ये असल्याचे जाहीर होताच महाविकास आघाडीसह राजकारणात खळबळ उडाली. त्यानंतर आज पुन्हा एकदा मध्यरात्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले 35 आमदारांचा फोटो व्हायरल होताच शिंदे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

 बच्चू कडूंचे एकनाथ शिंदेंना पाठबळ

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर हॉटेलमधील जो फोटो व्हायरल झाला आहे त्यामध्ये प्रहार संघटनेचे प्रमुख आणि मंत्री बच्चू कडू यांचाही या फोटोमध्ये समावेश आहे. तोही अगदी एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसलेला. हा फोटो व्हायरल झाल्याने बच्चू कडूंबद्दल अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत असलेले बच्चू कडूही नाराजी आहेत का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

आमदारांनी मोबाईल वापरायचा नाही

मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र हॉटेलमधील 35 बंडखोर आमदारांचा फोटो ज्यावेळी व्हायरला झाला त्यावेळी पुन्हा एकदा राजकीय चर्चेला उधाण आले. फोटो व्हायरल होताच असं सांगण्यात येत आहे की हॉटेलमध्ये असलेल्या कोणत्याही आमदाराला मोबाईल वापरू दिला नाही. त्याबरोबरच बच्चू कडूंचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे अनेकाना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्याचबरोबर या फोटोमध्ये दोन महिला आमदाराचांही समावेश असल्याचे दिसत आहे.

आमदारांना कॅबिनेट मंत्री पदाचे अश्वासन

एकनाथ शिंदे यांच्या बरोबचा 35 आमदारांचा पहिला फोटो व्हायरल होताच आणि त्यामध्ये आमदार बच्चू कडू शेजारी बसलेले दिसल्याने अनेकांना तो धक्का बसला आहे. या फोटोतील सर्व आमदारांना एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्री पद देण्याचे अश्वासन दिले आहे त्यामुळे अनेकांनी त्यांना साथ दिल्याचे बोलले जात आहे.

पुढचा मुख्यमंत्री आमचाच

तर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीविषयी जेव्हा मंत्री बच्चू कडू यांना विचारण्यात आले होते, त्यावेळी त्यांनीही सांगितले होत की, आता येथून पुढचा काळ हा लहान पक्षांचा असणार आहा. त्यामुळे पुढील काळात आमचेच राज्य असणार असल्याचेही त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. ही प्रतिक्रिया व्यक्त करत असताना त्यांनी हे ही सांगितले की, पुढच्या वेळेस आमचाच मुख्यमंत्री असणार असल्याचा दावाही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना केला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.