‘तेव्हा महिलांवरचं प्रेम का उतू गेलं नाही?’, संजय गायकवाड यांचा उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री निवडून आणण्याचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.

'तेव्हा महिलांवरचं प्रेम का उतू गेलं नाही?', संजय गायकवाड यांचा उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 8:34 PM

बुलढाणा : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री निवडून आणण्याचे संकेत दिल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या याबाबतच्या वक्तव्याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंना तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा पहिल्या मुख्यमंत्र्याबाबत का सूचलं ना? असा प्रश्न विचारलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर बरसले आहेत. “तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा तुम्हाला का सूचलं नाही?”, असा सवाल त्यांनी केलाय. त्यामुळे या मुद्द्यावरुन राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

“ज्यावेळेला तुम्ही स्वत: मुख्यमंत्री झालात तेव्हा तुम्हाला का नाही सूचलं की राज्याला महिला मुख्यमंत्र्यांची आवश्यकता आहे म्हणून? तेव्हा महिलांवरचं आपलं प्रेम का उतू आलं नाही? तेव्हाच करायचं असतं”, असा घणाघात संजय गायकवाड यांनी केला. त्यांच्या या विधानावरुन ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरुन पुन्हा एकदा निशाणा साधलाय. शिंदे गटाच्या आमदारांना भाजापकडून आणखी पाच कोटी देण्यात आल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. चंद्रकांत खैरे यांच्या या दाव्यावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“ज्यावेळेस सत्तांतर झालं त्यावेळेसच नवस केला होता की शिवसेना-भाजप युतीचं सरकार येईल, त्यावेळेस पुन्हा देवीच्या दर्शनाला जाऊ. त्याअर्थाने सगळेजण दर्शन घ्यायला गेले. आता कुणी काही म्हणत असतील की, पाच कोटी घेतले का? तर मोजायला गेले असतील का ते मला माहिती नाही. माणूस ज्या देवाची श्रद्धा ठेवतो ती पूर्ण करतो ही आपली पद्धत आहे. त्यामुळे ते गेले होते”, असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी दिलंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.