तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणी मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडवर

तलाठी भरती परीक्षा सुरु असताना पेपर फुटीचं धक्कादायक प्रकरण समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरकारने याप्रकरणी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

तलाठी भरती पेपरफुटी प्रकरणी मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडवर
Follow us
| Updated on: Aug 30, 2023 | 5:48 PM

मुंबई | 30 ऑगस्ट 2023 : राज्यात सध्या तलाठी भरतीच्या परीक्षा सुरु आहेत. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत या परीक्षा संपतील. पण या परीक्षा सुरु झाल्यापासून वादात सापडल्या आहेत. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेला उशिर झाला. काही ठिकाणी पेपर फुटीचा प्रकरण समोर आला. काही लोकांकडे प्रश्नपत्रिकाच आढळली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आता याच प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. पेपर फुटी प्रकरणात आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, तसेच तलाठी परीक्षा पुन्हा एकदा घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. असं असताना या पेपर फुटीच्या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

तलाठी पेपर भरती प्रकरणानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडवर आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जावी यासाठी वरिष्ठ पातळीवर सूत्रे हलत असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पेपर फुटी प्रकरणावर चौकशी करण्यासाठी दोन विशेष ओएसडी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्र्यांचं विद्यार्थ्यांना कारवाईचं आश्वासन

आमदार बच्चू कडू यांची आज मुंबईत एमपीएससीच्या समन्वयकांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागाच्या होत असलेल्या परीक्षांची फी कमी करण्यात यावी, या विषयावर चर्चा झाली. राज्य सरकार या संदर्भात सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तलाठी पेपर फुटीसंदर्भात कडक कायदे करणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे.

बच्चू कडू यांची महत्त्वाची मागणी

दरम्यान, बच्चू कडू यांनी पेपरफुटी प्रकरणावर याआधीदेखील प्रतिक्रिया दिलीय. खून करणाऱ्याला जशी मृत्यू दंडाची शिक्षा केली जाते अगदी त्याच धर्तीवर किंवा तशीच कठोर शिक्षा पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना देण्यात यावी, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांची मुलं या भरतीसाठी प्रयत्न करतात. त्यामुळे पेपरफुटीतून या शेतकऱ्याच्या मुलांची संधी हिसकावली जात असल्याचीदेखील प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली होती.

लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.