ठाणेः ठाणे येथे अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांची बैठक सुरू होती, त्यानंतर मुख्यमंत्री निघण्याची वेळ झाली, त्यावेळी ते निघत असताना पोलीस शिपाई रूपाली साळुंखे (Police Constable Rupali Salunkhe) यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. त्या खाली पडल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत (Police Injured) झाली. पोलीस शिपाई खाली पडल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतःहून पोलीस शिपाई रूपाली साळुंखे यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी देण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस शिपाई यांच्याबाबत दाखवलेल्या काळजीवरून पोलीस दलातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व यंत्रणांनी सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत. बैठकीप्रसंगी अधिकाऱ्यांना सुरक्षेच्या सुचनाही करण्यात आल्या.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर आषाढी एकादशी नियोजनाबाबत आढावा घेतला आहे सर्वांसंबेत चर्चा केली. पंढरपूराला जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे त्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. यावेळी टोल फ्री बाबत मुख्य सचिवांना सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असल्याने 4000 च्यावर बसेस सोडण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पोलीस हा कायदा सुव्यवस्था पाहणारा, रस्त्यावर येऊन काम करणारा कर्मचारी आहे. त्यामुळे त्याला घरची चिंता नसावी. यासाठी आम्ही सिडको घर वाटपाबाबत आम्ही पोलिसांसाठी निर्णय घेतला होता. त्यानंतर आताही मी पोलिसांसाठी एक नवीन प्लॅन करून आम्ही त्यावर अंमलबजावणी करू, पंढरपूरसाठी एक विकास आराखडादेखील आम्ही तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिसांच्या सोयी सुविधा आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, ठाणे शहराला वेगळे धरण देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याविषयी सांगताना म्हणाले की, मी पवार साहेब यांची भेट घेतली आहे, मात्र तो फोटो आताचा नाही, त्यांच्याबरोबर झालेली भेट आणि त्यांना भेटलो आहे मी लपवणार नाही असंही त्यांनी सांगितले. शरद पवार यांनी मी भेटू शकतो यामध्ये काही गैर नाही म्हणत शरद पवार मोठे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.