Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे शुन्यात, या दोन धक्क्यातून ते सावरलेच नाहीत, संजय राऊत म्हणाले खोटं बोलत असेल तर त्यांना थेट विचारा

Sanjay Raut on Eknath Shinde : सामन्यातील रोकठोकमधून एकनाथ शिंदे यांच्या मनोस्थितीचा मागोवा घेण्यात आला. सामनातून त्यांना चिमटे काढण्यात आले. तर आता माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे शु्न्यात गेल्याचा खोचक टोला राऊतांनी हाणला.

एकनाथ शिंदे शुन्यात, या दोन धक्क्यातून ते सावरलेच नाहीत, संजय राऊत म्हणाले खोटं बोलत असेल तर त्यांना थेट विचारा
संजय राऊत यांचा निशाणा
Follow us
| Updated on: Feb 02, 2025 | 10:58 AM

महायुतीचा महाविजय झाला. त्यात भाजपाने सर्वाधिक जागा खेचून आणल्या. मुख्यमंत्री भाजपाचा झाला. पण याकाळात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाराजी नाट्य अधिक गाजले. आता विधानसभेचा निकाल येऊन बराच काळ लोटला असला तरी उद्धव ठाकरे सेनेने एकनाथ शिंदे यांना डिवचण्याची संधी काही सोडली नाही. आजच्या सामनातील रोखठोकमधून चिमटे नि गुदगुल्या केल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना, एकनाथ शिंदे हे शुन्यात गेल्याचा खोचक टोला लगावला. ते दोन धक्क्यातून सावरले नसल्याचा टोला हाणला.

संजय राऊतांची तुफान बॅटिंग

सामनातील रोखठोक मधील विषय सर्वांनाच माहिती आहे. महायुतीत एकसंघात नाही, एक वाक्यता नाही, असा गौप्यस्फोट त्यांनी केला. एकमेकांविरुद्ध कुरघोड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर एकनाथ शिंदे यांची कुरघोडी करण्याची ताकद, कुरघोडी करण्याची ताकद भाजपाने संपवल्याचा टोला त्यांनी हाणला. भाजपामुले एकनाथ शिंदे आणि त्यांचा गटाचा एक सरपटणारा प्राणी झाला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असे वचन दिल्यानंतरच ते शिवसेनेतून फुटल्याचे खासगीत ते सांगतात, असे राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

मी खोटं बोलत नाही, त्यांना जाऊन विचारा

एकनाथ शिंदे यांना भाजपाने विधानसभा निवडणूक 2024 नंतर सुद्धा मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते, त्यामुळेच त्यांनी शिवसेना फोडली, असे ते खासगीत सांगतात. मी खोटं बोलत नाही, तुम्हाला तसं वाटत असेल तर त्यांना जाऊन विचारा, असे राऊत म्हणाले. पण निवडणूक झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केले.

एकनाथ शिंदे धक्क्यातून सावरलेले नाही

एकनाथ शिंदे यांची भाजपाने काही मंत्री पदावर बोळवण केली. पण शिंदे यांची देहबोली बरंच काही सांगून जाते. एकनाथ शिंदे हे शुन्यात आहेत. ते धक्क्यातून सावरलेले नाहीत. इतके विरोधी वातावरण असताना आपल्या पक्षाला 50-55 जागा मिळाल्या कशा, हा पहिला धक्का तर भाजपाने मुख्यमंत्री पदाचा शब्द पाळला नही हा दुसरा धक्का त्यांना बसला आहे. एकनाथ शिंदे हे पूर्णपणे कोलमडलेले आहेत. त्यांची या सरकारमध्ये कोंडी झाली आहे, अशी टीका राऊतांनी केली.