मुंबईः विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan PArishad Result) राज्यात महाविकास आघाडीत राजकीय भूकंप होईल याची कोणाला शक्यताही वाटली नव्हती. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर दुपारीच्या वेळी चला जरा फिरून येऊ म्हणून ज्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काही आमदार घेऊन बाहेर पडले त्यावेळेपासूनच राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ज्यावेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदार घेऊन बाहेर पडले त्यावेळेपासूनच आपणाला कुणकूण लागली होती असंही चंद्रकांत खैरे यांनी मत व्यक्त केले होते
मात्र आज जेव्हा एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 13 आमदार सूरतमध्ये (MLA 13 Surat) असल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर मात्र राजकीय नाट्याला वेग आला आहे.एकनाथ शिंदे यांच्या या नाराजी नाट्यनंतर आणि त्यांनी दिलेल्या मुख्यमंत्र्यांना प्रस्तावानंतर भाजपचे ऑपरेशन लोटस यशस्वी होणार का याकडेच साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत 13 आमदार सुरतमध्ये असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर तीन प्रस्ताव ठेवण्यात आले त्यावेळीच अनेकांनी भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी होणार असल्याचे भाकीत केले होते.
सुरतमध्ये आपल्यासोबत असलेले आमदार घेऊन ज्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव दिला त्यावेळीच महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात येणार की सरकार राहणार या चर्चेनाही उधान आले होते.
एकनाथ शिंदे यांच्या त्या प्रस्तावानंतर मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अहमदाबाद तर संजय कुटे सूरतमध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट होताच महाविकास आघाडीच्या सरकारला सुरुंग लागणार का अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.या सगळ्या राजकीय नाट्यात शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत याबाबतची चर्चा महाविकास आघाडीतील नेत्यांबरोबर घेत शिवसेनेचा तो अंतर्गत विषय आहे असं स्पष्ट मत शरद पवार यांनी मांडले आहे.