गुवाहाटी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला आज पाच दिवस झाले आहेत. शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार दोन हजार किलोमीटर दूर गावाहाटीत आहे. मात्र या बंडामुळे महाराष्ट्रात शिवसैनिकांनी (Shivsena) रान पेटवलं आहे. शिवसैनिकांनी कुणाचं ऑफीस फोडलं. तर कुणाच्या पुतळ्यांची जाळपोळ केलीय. तर कुणाच्या पोस्टरला काळं फासलं आहे. सध्या ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी महाराष्ट्रात धुरळा उडवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनीही आक्रमक मोडवर येत बैठकांचा सपाटा लावला आहे. या आजच्या बैठकीत तर त्यांनी शिंदे गंटाविरोधात पाच ठारव पास करत शिंदे गटाला जोरदार पंच मारला आहे. त्यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण ऐन पावसाळ्यातही जळत्या वणव्यासारखं पाहायला मिळतंय. तर तिकडे शिंदे गटाने जास्त आमदारांचा आकडा आमच्याकडे म्हणत आपल्या गटाला नवं शिवसेना बाळासाहेब असं नावंही देऊन टाकलंय. मग शिंदेसोबत एकूण आमदार किती? असाही सवाल विचारला जात आहे. त्याचे उत्तर आम्ही शोधलंय. शिंदे गटात आता शिवसेनेचे 38 बंडखोर आमदार आहेत. तर 9 अपक्ष आमदारही आहेत. हा टोटल आकडा आता 47 वर गेलाय.
सध्याचं महाराष्ट्रातलं चित्र पाहिल्यास सर्वसामान्य शिवसैनिकांचा पाठिंबा हा उद्धव ठाकरे यांना वाढत चालला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा कादेशीर पेचही वाढत चालला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर विलीकरणचाच पर्याय असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे आमदारांच्या निलंबनासाठी ठाकरे समर्थ शिवसेना नेते हे विधानसभा उपाध्यक्षांच्या गाठीभेटी घेत आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचं पुढचं पाऊल काय असणार? याकडेही सध्या संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत.