Eknath Shinde : बाप्पा पावला! यंदा गणपती मूर्तींच्या उंचीवर मर्यादा नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

मुंबईची जी नियमावली आहे. तीच राज्यभर लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूर्त्यांच्या ऊंचीवर मर्यादा होती. ती काढून टाकली आहे.

Eknath Shinde : बाप्पा पावला! यंदा गणपती मूर्तींच्या उंचीवर मर्यादा नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
फडणवीसांच्या हस्तक्षेपामुळे राज्याचा अपमान, मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदा घेणं बंद करावं, राष्ट्रवादीचा नेमका आक्षेप काय?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 4:43 PM

मुंबई : गणेश मूर्तींच्या उंचीवर यंदा मर्यादा असणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. गणेशोत्सव (Ganeshotsav) आणि इतर सण सुरळीत पार पाडण्यासाठीच्या नियमांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्यासह यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील (Devendra Fadnavis) उपस्थित होते. ते म्हणाले, की गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत. मंडप आणि इतर परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजेत, यासाठी खेटे घालायला लागू नये, म्हणून एक खिडकी योजना आणि ऑनलाइन परवानग्या दिल्या आहेत. या मंडळांना कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क भरावे लागणार नाहीत, याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना शुल्कातून सूट दिली आहे, असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत.

वर्षानुवर्ष गणेशोत्सव करणाऱ्यांकडून हमी पत्र घेऊ नका असे त्यांनी सांगितले. नियमांचे पालन करावे लागेल. पण त्याचा बागुलबुवा उभा करू नये, याच्या सूचना केली आहे. मुंबईची जी नियमावली आहे. तीच राज्यभर लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूर्तींच्या उंचीवर मर्यादा होती. ती काढून टाकली आहे, असे शिंदे म्हणाले.

नियम पाळण्याच्या सूचना

दहीहंडीबाबतही त्यांनी नियमावली सांगितली. नियम पाळण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. सर्व उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडले पाहिजेत. कोविडचे संकट टळले आहे. त्यामुळे सर्वांमध्ये उत्साह आहे. मिरवणुका जोरात होणार असल्याचे ते म्हणाले. आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहेत. यंदा काहीच अडचण नाही. कोविडचे नियम सध्या शिथिल करण्यात आलेले आहेत. न्यायालयाच्या निर्णयानुसार नियमांचे पालन होईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

एसटी बसेस वाढवण्याचे निर्देश

उत्सवाच्या काळातील बस सुविधांबाबतही त्यांनी माहिती दिली आहे. दरवर्षी मुंबई, पुणे, कोल्हापूर मार्गे आणि कोकणात टोलमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी बसेस वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.