एकनाथ शिंदे हा तळागळातील कार्यकर्ता; शिवसेनेत कर्तत्ववान माणसाची हेळसांड;प्रवीण दरेकरांनी दिली नाराजीनाट्यवर प्रतिक्रिया

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा आयोध्या दौरा ठरल्यावेळेपासूनच एकनाथ शिंदे यांची फरपट शिवसेनेत दिसून येत होते. आयोध्या दौऱ्याप्रसंगी संजय राऊत आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या नेत्यांनी आयोध्या दौरा केला त्यावेळीही एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आले होते

एकनाथ शिंदे हा तळागळातील कार्यकर्ता; शिवसेनेत कर्तत्ववान माणसाची हेळसांड;प्रवीण दरेकरांनी दिली नाराजीनाट्यवर  प्रतिक्रिया
Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 12:17 PM

मुंबईः शिवसेनेचा (Shivsena) तळागळातील कार्यकर्ता या अडीच वर्षात शिवसेनेच्या कारभारामुळे कंटाळला आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांच्यासारख्या रस्त्यावरच्या आणि तळागाळातील कार्यकर्त्याच्या कर्तत्वाची पक्षात जर हेळसांड होत असेल तर एकनाथ शिंदे यांच्यासारखा निर्णय घ्यावा लागेल अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निर्णयाबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केली. विधान परिषदेच्या निकाल जाहीर झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचे नाराजी नाट्य चव्हाट्यावर आले. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांसह त्यांच्याशी कालपासून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र संपर्क झाला नसल्यामुळे महाविकास आघाडीतीलराजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.

कालच्या निकालानंतर आज उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची दुपारी बैठक होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे तळागळातील कार्यकर्ता

विधान परिषदेचा निकाल लागल्यापासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबले होते. त्यामुळे कालपासून शिवसेनेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. शिवेसेनेचे म्हणेजच महाविकास आघाडीचे सरकार आल्याापासून एकनाथ शिंदे नाराज होते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेनेचा खंदा कार्यकर्ता आणि तळागाळातून आलेला कार्यकर्ता नाराज होता, त्यामुळेच अशा नेत्यांवर असा निर्णय घेण्याची वेळ येते अशी प्रतिक्रियाही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.

 या बंडाळीमुळे असंतोष चव्हाट्यावर

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्याबंडाळीच्या निमित्ताने शिवसेनेतील नाराजी नाट्य चव्हाट्यावर आणले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ही बंडाळी आजची नाही तर अनेक दिवसांपासून त्यांच्या वर होत असलेल्या अन्यायामुळेच त्यांनी आज हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

शिवसेनेच दोन गट-तट

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते असे दोन गट शिवसेनेत असल्याचे दिसून येत असल्याचे मतही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले. काही आमदारांचे मंत्रालयात कोणतेही काम असले तरी ते आमदार प्रथम एकनाथ शिंदे यांनाच भेटत होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी अजित पवारांवरही काही आमदार नाराज असल्याचे सांगत. या त्यांच्या नाराजी नाट्यमुळेच एकनाथ शिंदे 13 आमदारांना घेऊन सुरतला गेले असल्याचेही प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

अयोध्या दौऱ्यापासून एकनाथ शिंदे यांची फरपट

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा आयोध्या दौरा ठरल्यावेळेपासूनच एकनाथ शिंदे यांची फरपट शिवसेनेत दिसून येत होते. आयोध्या दौऱ्याप्रसंगी संजय राऊत आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या नेत्यांनी आयोध्या दौरा केला त्यावेळीही एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे त्या दिवसांपासूनच एकनाथ शिंदे यांची फरपट दिसून येत होती अशी प्रतिक्रियाही प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?
म्हणून धारावीत महापालिकेची टीम गेली... फडणवीस काय म्हणाले?.
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू
भाजपने मित्र बनून मुख्यमंत्र्यांच्या मानेवर सुरी ठेवली : बच्चू कडू.
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी
फडणवीस साहेब बारीक झालेत नाही का?; नाना पाटेकर यांची मिश्किल टिप्पणी.
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस
पुणे विमानतळाला जगदगुरू संत तुकाराम यांचं नाव देणार : फडणवीस.
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?
धारावी प्रकरणात काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचा मोठा दावा काय?.
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात...
धारावीत राडा, महापालिकेच्या वाहनांची तोडफोड; संजय राऊत म्हणतात....
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप
त्यांना महाराष्ट्रात शरिया कायदा लागू करायचाय; नितेश राणे यांचा आरोप.
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव
धार्मिक स्थळाच्या अनधिकृत भागावर पालिकेचा हातोडा, धारावीत तणाव.