उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अध्यक्षपदावरून एकनाथ शिंदेंची थेट लायकीच काढली, म्हणाले…

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या महापत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेच्या अध्यक्षपदाबाबत बोलताना लायकी आहे का? अशा शब्दात टीका केली.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अध्यक्षपदावरून एकनाथ शिंदेंची थेट लायकीच काढली, म्हणाले...
Follow us
| Updated on: Jan 16, 2024 | 7:25 PM

मुंबई : आमदार अपात्रतेवर दिलेल्या निकालावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेतली. यामध्ये वकील असीम सरोदे यांनी कायदेशीर बाजू मांडत राजकारण करत निकाल दिल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी अनिल परब यांनी 2013 वेळी घटना बदलतानाचे व्हिडीओ दाखवले.  त्यावेळी शिवसेना प्रमुख हे पद गोठवताना सर्वांनी मंजुरी दिली होती. त्यासोबतच शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांंची निवड केली गेली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंचा शिदेंवर निशाणा

तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणार. लायकी आहे का? गर्दीत गारद्यांच्या शामील रामशास्त्री… सुरेश भट म्हणतात. आता मेल्याविन मढ्याला उपायच नाही. दुसरा उपायच नाही. आपण फक्त मढं पाहणार की लोकशाहीच्या खुन्यांचं मढं करणार.म्हणजे राजकारणात. एकूणच जी काही थट्टा सुरू आहे. घटना नाही, घटना नाही. हे काय आहे. अनिल आणि असीम मी म्हणतो बरोबर की चूक ते सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

निवडणूक आयोगावर केस केली पाहिजे. त्यांनी कामाला लागलो होतो. 19 लाख 41 हजार शंभर रुपयांच्या स्टँम्पवर शपथपत्र पुरवली होती. निवडणूक आयोग काय त्यावर गाद्या करून झोपलंय का. एक तर ते स्वीकारा आमचा हक्क आम्हाला द्या. 19 लाख 41 हजार इनटू आम्हाला द्या. हा मोठा घोटाळा आहे. शिवसैनिकांचे पैसे गेले आहेत. ते काही दोन नंबरचे नाही. ईडी त्यांचे नोकर आहे. उघड बोलतो. काय करणार आहेत बघून घ्या, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नालायक लोक घेऊन गिळायला निघाला. आज ठिक आहे. उद्या बघून घ्या. गिळल्यानंतर 24 तासाने काय होणार. काही लोक म्हणतात उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर मला सत्तेचा मोह नाही. मी कायदा पाहत नाही. मी दिला राजीनामा. कोर्टाने म्हटलं तुम्हाला मुख्यमंत्री केलं असतं. पण कोर्टाने जे निरीक्षण नोंदवलं ते गंभीर आहे. अधिवेशन बोलावलं ते असंवैधानिक होतं. म्हणजे सरकारच असंवैधानिक होतं. कोश्यारी त्या कटात सहभागी झाले. ही फक्त शिवसेनेची लढाई नाही. उद्धव ठाकरे यांची नाही. या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही याची लढाई. सुप्रीम कोर्टाचं अस्तित्व राहणार की नाही की त्याच्या डोक्यावर लवाद बसेल याची ही लढाई आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वोच्च मानायाचा की या लबाडाचा मानायचा हे महत्त्वाचा असल्याचं ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.