Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटातील आमदारांना कडेकोट सुरक्षा देणार, 4 सशस्त्र पोलीस, सुरक्षा वाहन, ताफ्यात नेमकं काय? वाचा

गेल्या काही दिवसात आमदारांच्या घरांची सुरक्षाही थेट केंद्र सरकारकडून वाढवण्यात आली होती. काही आमदारांना वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती.

Cm Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटातील आमदारांना कडेकोट सुरक्षा देणार, 4 सशस्त्र पोलीस, सुरक्षा वाहन, ताफ्यात नेमकं काय? वाचा
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 10:14 PM

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटातील (Eknath Shinde) बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवरून (MLA Security) आणि राजकीय परिस्थितीवरून बराच वाद रंगला आहे. हे आमदार बाहेरील राज्यात असताना तिथल्या सरकारने त्यांना कडेकोट सुरक्षा (Police Protection) पुरवली. तर आधी सुरक्षा असताना पोलिसांनी आमदार बाहेर कसे गेले असे सवालही विचारण्यात आले. मात्र सरकार स्थापन होताच एकनाथ शिंदे सरकारने आमदारांच्या सुरक्षेचा नवा प्लॅन आखला आहे. आमदार राज्यात आल्यानंतर ते तुम्ही कडेकोड सुरक्षेच्या ताफ्यासह दिसणार आहेत. तर गेल्या काही दिवसात आमदारांच्या घरांची सुरक्षाही थेट केंद्र सरकारकडून वाढवण्यात आली होती. काही आमदारांना वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती. आत्ताच्या त्यांच्या सुरक्षेचा नवा प्लॅन काय असणार आहे? यावरही आपण एक नजर टाकूया…

आमदारांच्या सुरक्षेचा नवा प्लॅन

  1. एकनाथ शिंदे गटातील सर्व आमदारांना आता राज्य सरकार देणार पोलीस सुरक्षा देणार आहे.
  2. स्थानिक पोलीस आणि विशेष सुरक्षा विभागची ही जबाबदारी असणार आहे.
  3. तसेच एका आमदारासोबत चार सशस्त्र पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा वाहन असणार आहे.
  4. स्थानिक मतदारसंघात किंवा इतर ठिकाणी काही विरोध होऊ नये राज्य सरकारकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी आत्तापासूनच विशेष पोलीस शाखेकडून आमदारांच्या सुरक्षेबाबत चाचपणी सुरु आहे.
  5. थोड्यात एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना मिळणारी सुरक्षा ही जवळपासून राज्यमंत्र्यांच्या दर्जाची असणार आहे.
  6. वरीलप्रमाणे सुरक्षा ही शिंदे गटातील सर्व 50 आमदारांना पुरवी जाणार आहे.

संभाव्य धोका काय?

एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांनी बंड केल्यापासून राज्यात अनेक ठिकाणी या आमदारांविरोधात आंदोलनं झाली आहे. आमदार तर राज्यात नव्हते मात्र ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी आपला रोष हा आमदारांच्या कार्यालयांवर आणि पोस्टवर काढला आहे. अनेक ठिकाणी मोठी आंदोलनही झाली आहे. तर ठाकरे समर्थक शिवसेना नेत्यांकडूनही आंदोलकांवर शाब्दिक हल्लाबोल चढवणे हे गेल्या काही काळात सतत सुरूच आहे. हे पाहता आणि रस्त्यावरचा रोष पाहाता. या आमदारांच्या सुरक्षेवरून नवं सरकारही आता अलर्ट मोडवर आलं आहे.

मतदारसंघातही तीव्र प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता

इतर ठिकाणचे शिवसैनिक तर आक्रमक आहेत. मात्र या आमदारांच्या मतदारसंघातही अनेक ठिकाणी यांच्याविरोधात आंदोलनं झाली आहे. त्यामुळे ही सुरक्षा ही स्थानिक लेव्हलपर्यंत असावी अशी काळजी राज्य सरकारकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे बंडखोर आमदार हे आगामी काळात सुरक्षेच्या तगड्या ताफ्यासह दिसणार आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.