लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंची पहिली यादी, 5 ठिकाणी होणार थेट लढत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केलीय. शिंदे गटाच्या पहिल्या यादीत 8 जणांची नावं आहेत. विशेष म्हणजे पहिल्या यादीत श्रीकांत शिंदेंचं नाव नाहीय. तर आतापर्यंत 5 ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे अशी थेट लढती निश्चित झाल्यात. जाणून घ्या.

लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंची पहिली यादी, 5 ठिकाणी होणार थेट लढत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 11:10 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली असून 8 जणांचीउमेदवारी जाहीर केलीय.पहिल्या यादीत 8 पैकी 7 विद्यमान खासदारांना शिंदेंनी पुन्हा तिकीट दिलंय. दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळे, कोल्हापूर संजय मंडलिक, शिर्डी सदाशिव लोखंडेृ, बुलडाणा प्रतापराव जाधव, हिंगोली हेमंत पाटील, मावळ श्रीरंग बारणे, रामटेक राजू पारवे, हातकणंगले धैर्यशील मानेंना तिकीट दिलंय

रामटेकमधून विद्यमान खासदार कृपाल तुमानेंचा पत्ता कट झालेला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर झालेली नाही. तसंच ठाण्यातूनही राजन विचारेंच्या विरोधात उमेदवाराची घोषणा झालेली नाही. आता शिंदे आणि ठाकरेंमध्ये थेट लढती कुठं आहेत वाचा सविस्तर.

पाहा व्हिडीओ:-

दक्षिण मध्य मुंबईत ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे, शिर्डीतून ठाकरेंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध शिंदेच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडेंमध्ये लढत होईल. बुलडाण्यात ठाकरेंचे नरेंद्र खेडेकर विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव, हिंगोलीत ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विरुद्ध हेमंत पाटील मावळमध्ये ठाकरे गटाचे संजोग वाघेरेंच्या विरोधात शिंदे गटाकडून श्रीरंग बारणे मैदानात आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंंदे यांचे नाव पहिल्या यादीमध्ये नाही. पहिल्या यादीमध्ये नाशिक, कल्याण-डोंबिवली आणि यवतमाळ-वाशिम या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत. या जागांवरचा तिढा कायम असल्याचं दिसत आहे त्यामुळे या जागांवर उमेदवाराची घोषणा केली गेली नसावी. तर मावळमधून श्रीरंग बारणे यांना परत एकदा उमेदवारी  देण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.