मुंबई: लॉकडाऊनच्या काळातील वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक होण्याची शक्यता आहे. वीज बिलाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत निवेदन, अर्ज बैठका, विनवण्या हे सगळे उपाय करुन झाले. तरीही सरकार ढिम्म आहे. त्यामुळे आता जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल. कारण, “लाथो के भूत बातों से नही मानते”, असे संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता राज्य सरकार वीजबिलाच्या मुद्यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (MNS may get aggressive on electricity bill issue)
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊनच्या काळातील वीज बिले नागरिकांना भरावीच लागतील, असे नुकतेच सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे सरकारकडून आता वीज बिलांच्या मुद्द्यावर फेरविचार केला जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यावेळी वीज बिलांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो.
मात्र, तसे न झाल्यास ‘मनसे’कडून रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाऊ शकते. वाढीव वीज देयकांच्या विषयावर आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक असून, नेते आणि सरचिटणीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी दुपारी 2 वाजता मनसे पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. वाढीव वीज देयकांवर घेतलेल्या यू-टर्नवर सरकारला घेरण्यासाठी बैठकीत आंदोलनाची व्यूहरचना ठरण्याची शक्यता आहे.
‘राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे न जाता राज्यपालांना भेटायला का गेले हे संजय राऊतांना आता कळाले असेल’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे काहीच निर्णय घेऊ शकत नाहीत, हे माहिती असल्यामुळेच राज ठाकरे (Raj Thackeray) वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटायला गेले होते, असा टोला ‘मनसे’कडून लगावण्यात आला होता.
“भाजपकडून पराचा कावळा करुन जनतेला भडकवण्याचं काम”; शिवसेनेचा पलटवार
“वाढीव वीजबिल आणि वीजदराबबात उर्जामंत्री नितीन राऊत यांनी खुलासा केला आहे. पराचा कावळा करून भारतीय जनता पक्षाचे नेते जनतेला भडकवण्याचे काम करत आहेत,” असा आरोप शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी भाजपवर केला.
संबंधित बातम्या:
वाढीव वीजबिलांच्या विरोधात मनसे रस्त्यावर, अविनाश जाधवांचा थेट ऊर्जामंत्र्यांना इशारा
आधी राज्यपालांशी चर्चा, मग शरद पवारांना फोन, आता वीजबिलांबाबत मनसेचं पुढचं पाऊल
‘राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे न जाता राज्यपालांना भेटायला का गेले हे संजय राऊतांना आता कळाले असेल’
(MNS may get aggressive on electricity bill issue)