मुंबईत लहान मुलांच्या वाडिया रुग्णालयात बत्ती गुल, नेमकं काय घडलंय?
मुंबईत लहान मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या वाडिया रुग्णालयात अचानक लाईट गेल्याने खळबळ उडाली आहे.
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरातून एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबईत लहान मुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या वाडिया रुग्णालयात अचानक लाईट गेल्याने खळबळ उडाली आहे. लाईट गेल्याने संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला आहे.
वाडिया रुग्णालयात अनेक लहान बाळं आयसीयूत काचेच्या पेटीत, व्हेंटिलेटरवर आहेत. सुदैवाने या रुग्णालयात जनरेटर सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
लाईट गेल्याने हॉस्पिटलमधील सगळी सिस्टीम गेल्या अर्ध्या तासापासून पूर्णपणेल बंद पडल्याची चर्चा आहे. तसेच आयसीयूतील बाळांना धोका उद्भवला चर्चा आहे. पण जनरेटच्या आधाराने आयसीयूत लाईट असल्याची माहिती समोर आलीय.
वाडिया रुग्णालय हे लहान मुलांसाठी प्रसिद्ध आहे. इथे अनेक नवजात बालकं जन्माला येतात. या रुग्णालयात अनेक बालक आणि त्यांच्या मातांना जीवनदान मिळतं. इथले डॉक्टरही तितकेच तज्ज्ञ आहेत.
असं असताना इतक्या महत्त्वाच्या रुग्णालयाची बत्ती नेमकी गुल कशी होऊ शकते? असा प्रश्न उपस्थित होतोय. वाडिया रुग्णालयात बत्ती गुल होण्यामागील नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेवर चिंता व्यक्त केली जातेय.
संबंधित घटना दिवसा घडली आहे. पण मध्यरात्री ही घटना घडली तर? आण रुग्णालयात जनरेटची सुविधा नसती तर किती मोठा अनर्थ घडला असता? अशी चर्चा सध्या सुरु आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी आगीच्या घटनेमुळे वाडिया रुग्णालय चर्चेत आलं होतं. या रुग्णालयात आग लागल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. पण बालक आणि त्यांच्या मातांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली होती.