मोठी बातमी: उच्च न्यायालयाकडून अखेर वरवरा राव यांना जामीन मंजूर
वरवरा राव हे सध्या 81 वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. यासाठी वरवरा राव यांच्या कुटुंबीयांकडून त्यांना जामीन देण्याची मागणी केली जात होती | Varvara Rao
मुंबई: नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचा आरोप असणारे प्रसिद्ध तेलुगू कवी वरवरा राव (Varavara Rao) यांना सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. उच्च न्यायालयाने वरवरा राव यांना सहा महिन्यांसाठी सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला असला तरी वरवरा राव यांना हैदराबादमधील घरी जाण्यास न्यायालयाने परवानगी दिलेली नाही. (Elgar Parishad accused Varavara Rao grants bail by HC)
याशिवाय, त्यांच्यावर काही बंधनेही घालण्यात आली आहेत. वरवरा राव यांनी एनआयए न्यायालयाच्या हद्दीच्या बाहेर जाऊ नये. आपण राहत असलेल्या ठिकाणाचा पत्ता कळवावा. तसेच न्यायालयाच्या तारखांना हजर राहावे. वरवरा राव यांनी इतर आरोपींच्या संपर्कात राहता कामा नये. त्यांनी साक्षीदारांवर दबाव आणण्याचा किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करु नये, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.
वरवरा राव हे सध्या 81 वर्षांचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत आहे. यासाठी वरवरा राव यांच्या कुटुंबीयांकडून त्यांना जामीन देण्याची मागणी केली जात होती. मात्र, न्यायालाकडून अनेकदा ही विनंती फेटाळण्यात आली होती. अखेर तुरुंगात त्यांच्यावर उपचार शक्य नाहीत हे लक्षात आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात उच्च न्यायालयाने त्यांना रुग्णालयात हलवण्याची परवानगी दिली होती. त्यानंतर वरवरा राव यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, वरवरा राव यांची प्रकृती पाहता त्यांना जामीन मिळावा, अशी मागणी कुटुंबीयांकडून सातत्याने केली जात होती. वरवरा राव यांच्या पत्नी पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिका केली होती. प्रदीर्घ सुनावणीनंतर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला होता.
एनआयएची मागणी फेटाळली
वरवरा राव यांच्या जामिनाला स्थगिती देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. वरवरा राव सध्या 81 वर्षांचे असून आजारपणामुळे अंथरुणाला खिळले आहेत. राव यांनी गेल्या ३६५ दिवसांपैकी १४९ दिवस विविध रुग्णालयात घालवले आहेत. यावरुनच त्यांच्या आरोग्याची स्थिती लक्षात येते. राव यांची प्रकृती ही कारागृहात नाही, तर कुटुंबात राहून सुधारेल, असा दावा करत तळोजा कारागृहाऐवजी हैदराबाद येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राव यांच्या कुटुंबीयांतर्फे करण्यात आली होती.
वरवरा राव यांना अटक झाली होती?
नक्षलवाद्यांशी संबंध आणि एल्गार परिषदेच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील हिंसाचारास कारणीभूत ठरल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नक्षल संबंधांवरुन 28 ऑगस्ट रोजी पुणे पोलिसांनी देशभरातील विविध ठिकाणांहून कवी वरावर राव, गौतम नवलखा आणि या तीन जणांना अटक केली होती. भीमा कोरेगाव दंगल आणि त्यापूर्वी आयोजित एल्गार परिषदेशी यांचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या:
एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंसाठी बी. जी. कोळसे पाटील मैदानात
माओवाद खेड्यात रुजलाय, शहराशी संबंध नाही, पोलिसांनी अपमानित केलं: आनंद तेलतुंबडे
भीमा कोरेगाव प्रकरण : गौतम नवलखा आयएसआयच्या संपर्कात; NIAचा आरोपपत्रात दावा
(Elgar Parishad accused Varavara Rao grants bail by HC)