मुंबई : मुंबईत येत्या सोमवारपासून पाच दिवसांसाठी दहा टक्के पाणीकपात जाहीर करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यावरील न्यूमॅटिक झडपांच्या तातडीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार, दिनांक 17 मे 2021 ते शुक्रवार, दिनांक 21 मे 2021 पर्यंत पाणीकपात करण्याची घोषणा मुंबई महापालिकेने केली आहे. (Emergency repair work by BMC to lead 10% water cut in Mumbai from 17th to 21st May)
पाणीकपात कधी?
पुढच्या आठवड्यात पाच दिवसांमध्ये मुंबईकरांना पाणी कमी दाबाने आणि कमी कालावधीसाठी मिळण्याची शक्यता आहे. या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये सोमवार, दिनांक 17 मे 2021 ते शुक्रवार, दिनांक 21 मे 2021 या कालावधीत 10 टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. महापालिकेनेही या कालावधीत नागरिकांना सावध करण्यासाठी सूचना जारी केली आहे.
पाणीकपात कशासाठी?
मुंबईकर नागरिकांनी या पाणीकपात कालावधीत पाण्याचा यथायोग्य साठा करावा आणि पाणी जपून वापरावे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मुंबईत यंदा उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली नाही किंवा पाणी कपात करण्याची वेळही आलेली नाही. परंतु आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने दुरुस्तीची कामं हाती घेतल्याने पाणी कपात जाहीर करावी लागत आहे.
Emergency repair work of pneumatic valves on Pise Dam supplying water to Brihanmumbai Municipal Corporation (BMC) will be undertaken, due to which, 10% water will be cut in Mumbai’s water supply from May 17 to 21: Greater Mumbai Municipal Corporation#Maharashtra
— ANI (@ANI) May 11, 2021
याआधी, मुंबईत फेब्रुवारी महिन्यात अशाच प्रकारे दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवसांसाठी पाणी कपात करण्यात आली होती. सायन, दादर, परेल, लालबाग, माटुंगा या भागात पाणीकपात करण्यात आली होती.
हेही वाचा :
ठाण्यातही ‘ड्राईव्ह इन’ लसीकरण केंद्र, कुठे सोय? नियम आणि अटी काय?
(Emergency repair work by BMC to lead 10% water cut in Mumbai from 17th to 21st May)