असा गुन्हा दाखल झाला तरी आश्चर्य वाटायला नको, जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले
तुम्ही कुठलंही कलम कोणाविरुद्धही वापराल. एखाद्या महिलेला बलात्काराची तक्रार करायला लावालं.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेलेत. मुख्यमंत्र्यांच्या समोर माझ्याकडून काहीतरी घडलेलं दाखविण्यात येतं. मुख्यमंत्री जवळचं असताना गुन्हा घडतो. हे कसं मानायचं मी. माझ्यावर स्त्रीला टाकून गुन्हा नोंदविता. हा महाराष्ट्रातील एकाही महिलेला न पटलेला गुन्हा आहे.
१९३२ चा कायदा आणून एक दिवस जेलमध्ये ठेवलंत. खोटं अॅफिडेव्हीट करून तुम्ही सर्वोच्च न्यायालयात लटकविण्याचा प्रयत्न करताहेत. असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर केला.
अॅफिडेव्हीटमध्ये मला गुन्हेगार म्हणून नोंद करता. गेली ३५ वर्षे अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला. लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरतो. आंदोलनांचा हा वारसा शरद पवार यांच्याकडून घेतला असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं. आंदोलन हा एखाद्या राजकीय कार्यकर्त्याचा अंतरात्मा असतो, असंही त्यांनी म्हंटलं.
तुम्ही कुठलंही कलम कोणाविरुद्धही वापराल. एखाद्या महिलेला बलात्काराची तक्रार करायला लावालं. मला अटक करालं नि टेस्ट रिपोर्ट दोन महिन्यांनी मागवालं. तोपर्यंत दोन महिने जेलमध्ये टाकालं. आता हे काही नवीन राहिलेलं नाही. पोलीस दबाव असल्याचं सांगत होते. आता एखादी बलात्काराची तक्रार झाल्यास काही आश्चर्य वाटणार नाही, असंही आव्हाड म्हणाले.
शाईफेकीचं समर्थन कोणी करत नाहीत. शरद पवार यांच्यावर कांदे फेकले गेलेत. पण, कोणावर गुन्ह्याची नोंद झाली नाही. राजकारणात असतो तेव्हा ह्रदय मोठं असावं लागतं. आपण मंत्रिमंडळात आहात. आपण मंत्री म्हणून काम करता. ३०७ सारखे खोटे गुन्हे दाखल करता. कोणाचीतरी हत्या करण्याचा प्रयत्न. पत्रकारांचा दबाव आल्यानंतर सोडलं की नाही. चुकीचे गु्न्हे दाखल करून महाराष्ट्र पेटवू नका, अशी विनंती जितेंद्र आव्हाड यांनी केली.