Sanjay Raut : माझी मान कापली तरी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही; ईडीच्या नोटिशीनंतर संजय राऊतांची डरकाळी

ईडीने पाठवलेल्या समन्सनुसार त्यांची उद्या चौकशी होणार आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प कथित जमीन घोटाळा प्रकरणी ही नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. शिवसेनेत शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू असतानाच ही नोटीस आल्याने भाजपाचा हस्तक्षेप दिसून येत आहे.

Sanjay Raut : माझी मान कापली तरी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही; ईडीच्या नोटिशीनंतर संजय राऊतांची डरकाळी
शिवसेना नेते संजय राऊतImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 27, 2022 | 3:39 PM

मुंबई : माझी मान कापली तरी गुवाहाटीत जाणार नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. ट्विट करत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ईडीने संजय राऊत यांना समन्स पाठवले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना हे ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. संजय राऊत मागील काही दिवसांपासून खंबीरपणे शिवसेनेची बाजू मांडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे 39 शिवसेनेचे आमदार बंड करून गेले असून शिंदेंना समर्थन देणाऱ्या एकूण आमदारांचा आकडा 51वर गेल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. अशा परिस्थितीत होणाऱ्या शाब्दिक हल्ल्यांना प्रत्त्युत्तर देण्याचे काम शिवसेनेकडून संजय राऊत यांचे सुरू असतानाच अशाप्रकारची ईडीची नोटीस (ED has summoned) पाठवून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावरच राऊत यांनी भाष्य केले आहे.

भाजपावर हल्लाबोल

संजय राऊत ट्विटमध्ये म्हणतात, की मला आताचा समजले EDने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या.. मला अटक करा! जय महाराष्ट्र! असे आव्हान संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत केले आहे.

हे सुद्धा वाचा

चौकशीची वेळ वाढवून मागणार?

ईडीने पाठवलेल्या समन्सनुसार त्यांची उद्या चौकशी होणार आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प कथित जमीन घोटाळा प्रकरणी ही नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. शिवसेनेत शिंदे गट विरुद्ध शिवसेना असा वाद सुरू असतानाच ही नोटीस आल्याने भाजपाचा हस्तक्षेप ठळक झाला आहे. संजय राऊत यांनी आपले ट्विट देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे. त्यावरून हे शिक्कामोर्तबही होत आहे. दरम्यान, शिवसेनेचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे ईडीकडे चौकशीची वेळ वाढवून मागणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.