बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा देशात लॉरेन्स बिश्नोई याचे नाव चर्चेत आले आहे. लॉरेन्स बिश्नोई हा पुढे जाऊन गुन्हेगार होईल असे वाटले नव्हते. लॉरेन्स नेहमी महागडे कपडे आणि बुट वापरतो, त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्याचा दावा त्याच्या एका चुलत भावाने केला आहे. द डेली गार्डियनच्या एका वृत्तानुसार, त्याचे कपडे आणि बुटासाठी कुटुंबाला 35 ते 40 लाख रुपये खर्च येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. लॉरेन्स बिश्नोईचे चुलत भाऊ 50 वर्षीय रमेश बिश्नोई यांनी याविषयीचा खुलासा केला आहे.
कुटुंबाकडे 100 एकरपेक्षा अधिक जमीन
“आम्ही सुरुवातीपासूनच श्रीमंत होतो. लॉरेन्सचे वडील हे हरयाणा पोलीस दलात शिपाई होते. गावाकडे त्यांची 110 एकर जमीन आहे. लॉरेन्स नेहमी महागडे कपडे आणि शूजचा वापर करतो. आता ही त्याचे कुटुंब त्याच्यावर वार्षिक 35-40 लाख रुपये खर्च येतो.” अशी माहिती रमेश बिश्नोई यांनी दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लाँरेन्स गँगने घेतली आहे. सलमान खान याच्याशी जवळीकतेमुळेच ही हत्याचा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलीस या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याबाबत तपास करत आहे.
कॅनडा पोलिसांचा आरोप काय?
याशिवाय कॅनडा पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगवर गंभीर आरोप केला आहे. बिश्नोई गँग भारतीय सरकारी एजंटाच्या मदतीने त्यांच्या देशात हिंसक कारवाया करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्थात भारत सरकारने या सर्व दाव्यांचे खंडन केले आहे. देशात बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. छापेमारी केली. त्यात दहा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर काही जण अजूनही रडारवर आहेत.
लॉरेन्स बिश्नोई 2014 मध्ये राजस्थान येथील सालासर बालाजी मंदिर यात्रेदरम्यान गोळीबारानंतर तुरूंगात आहे. सध्या तो अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती तुरूंगात कैद आहे. गुजरात एटीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अनेक प्रकरणात त्याची चौकशी करत आहे.