Shrikant Shinde : एक तारखेचं दडपण नाही, सर्व प्रक्रिया लोकशाहीनुसारच केली; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
र्व प्रक्रिया लोकशाहीच्या मार्गाने झालेली आहे आणि लोकशाहीमध्ये आकड्याला अधिक महत्त्व असते. सर्व आमदार हे फ्लोअर टेस्ट पास होऊन आलेले आहेत, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
मुंबई : आम्हाला एक तारखेचे दडपण नाही. लोकशाहीमध्ये (Democracy) राहून या सर्व गोष्टी केल्या आहेत. आज आमच्याकडे संख्याबळ आहे. हे नंबर्स सर्व काही सांगत आहेत, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सध्या राजकीय घमासान सुरू आहे. शिवसेनेच्या चिन्हावरून, बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून जोरदार राजकारण होत आहे. न्यायालयात याविषयीचा निकाल 1 ऑगस्टला लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) बोलत होते. लोकशाहीमध्ये जो आकडा असतो, त्या आकड्याला महत्त्व असते. सर्व प्रक्रिया लोकशाहीच्या मार्गाने झालेली आहे आणि लोकशाहीमध्ये आकड्याला अधिक महत्त्व असते. सर्व आमदार हे फ्लोअर टेस्ट पास होऊन आलेले आहेत, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी पूरपरिस्थिती, दौरे त्याचप्रमाणे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याविषयीही आपले मत व्यक्त केले.
राज्यपालांचे मत वैयक्तिक
मुंबईसाठी किंवा महाराष्ट्रासाठी जे मराठी माणसाचे योगदान आहे, ते आपण कधीही विसरू शकत नाही. मुंबईला जी ओळख आहे ती मराठी माणसामुळे आहे. त्यामुळे राज्यपालांच्या मताशी सहमत नाही. त्यांचे हे वैयक्तिक वक्तव्य आहे. ते राज्यपाल असले तरी ते त्यांचे वैयक्तिक मत आगे. त्यामुळे आम्हाला ते मान्य नाही, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. मुंबईतून गुजराती, राजस्थानी बाहेर काढले, तर मुंबईत पैसा राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी केले होते.
काय म्हणाले श्रीकांत शिंदे?
मुख्यमंत्र्यांचे दौरे
राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री आदेश करतील, त्याठिकाणी आम्ही दौरे काढू. शिवसंपर्क अभियान ज्यापद्धतीने आम्ही काढले होते, तशाचप्रकारे आम्ही अभियान राबवून राज्यातील कानाकोपऱ्यात जाऊ, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. पूरपरिस्थिती असल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्याचे पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्याचे झाले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील नेत्यांचे दौरे सुरू असून सत्ताधारी मात्र केवळ सत्कार आणि राजकारणात गुंतले असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्याविषयी श्रीकांत शिंदेंना विचारले असता त्यांनी हे मत व्यक्त केले.