Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TRP Scam मधील आरोपी BARC चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता जे जे रुग्णालयात दाखल

टीआरपी घोटाळ्यातील आरोपी पार्थो दासगुप्ताला उच्च रक्तदाबामुळे मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ( Partho Dasgupta TRP Case)

TRP Scam मधील आरोपी BARC चा माजी सीईओ पार्थो दासगुप्ता जे जे रुग्णालयात दाखल
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 1:41 PM

मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणतील आरोपी BARC चे माजी CEO पार्थो दासगुप्ता याला जेजे रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. शुक्रवारी रात्री ब्लड शुगर वाढल्यानं दासगुप्ता याला जे जे रुग्णालयात भर्ती करण्यात आलं आहे. पार्थो दासगुप्ता यांना सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पार्थो दास याला टीआरपी घोटाळ्यात अटक करण्यात आली होती. पार्थो दासगुप्ता टीआरपी घोटाळ्याचा मास्टर माइंड असल्याच्या खुलासा मुंबई पोलिसांच्या तपासात झाला होता.( Ex-BARC CEO Partho Dasgupta accused in TRP Case admitted to J J Hospital because high blood pressure)

बल्ड शुगर वाढल्यानं दासुगप्ता रुग्णालायत

बार्कचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता याला मुंबई पोलिसांनी बोगस टीआरपी घोटाळ्यात अटक केली होती. त्यानंतर त्याची चौकशी सुरु होती. शुक्रवारी रात्री त्यांचं ब्लड शुगर वाढल्यानं जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

टीव्ही चॅनल्सकडून आपल्या चॅनलचा टीआरपी (TRP) वाढवण्यासाठी होत असलेल्या घोटाळ्याचा मुंबई पोलिसांनी मध्यंतरी भांडाफोड केला. त्यानंतर मुंबई पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा प्रकरणी टीआरपी ठरवणाऱ्या बार्क (BARC) या संस्थेच्या माजी सीईओ पार्थो दासगुप्ताना अटक केली होती.

पार्थो दासगुप्ता टीआरपी (टेलीविजन रेटिंग प्वाईंट्स) प्रकरणातील मास्टरमाईंड आहे. पार्थो दासगुप्ता 2013 ते 2019 या काळात BARC चा सीईओ होता, अशी माहिती मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त मिलिंद भारांबे यांनी दिली आहे.

मुंबई पोलिसांकडूनही बोगस टीआरपी प्रकरणी चौकशी सुरू

मुंबई पोलिसांनी 6 ऑक्टोबरला बोगस टीआरपी प्रकरणी एफआयआर नोंदवली होती. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत हे प्रकरण उघडकीस आणले होते. या दरम्यान रिपब्लिक टीव्ही सह इतर दोन मराठी चॅनेलच्या नावाचा उल्लेख पोलिसांनी केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काही जणांना अटक केली असून चौकशी सुरू आहे.

बोगस टीआरपी प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी देखील करण्यात आली होती. यानंतर रिपब्लिक टीव्हीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्यांना मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यास सांगण्यात आले होते. रिपब्लिक टीव्हीचे वकील हरिश साळवे यांनी हे प्रकरण सीबीआयला सोपवण्याची केलेली मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

संबंधित बातम्या

TRP Scam | रिपब्लिक चॅनलचे सीईओ विकास खानचंदानीला अटक, टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांची कारवाई

‘रिपब्लिक टीव्ही’च्या अर्णव गोस्वामी यांना अटक

TRP Scam | टीआरपी घोटाळाप्रकरणी आणखी एकाला अटक, आतापर्यंत 11 जण गजाआड

( Ex-BARC CEO Partho Dasgupta accused in TRP Case admitted to J J Hospital because high blood pressure)

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....